muktapeeth
muktapeeth 
मुक्तपीठ

आठवणीतले सर

यशवंत भुजबळ

दिव्यांग क्रिकेटला मान्यता मिळावी यासाठी ज्यांनी आयुष्य वेचले, त्यांना भारताने मिळवलेला विश्वकरंडक पाहायला मिळायला हवा होता.

इंग्लंडमध्ये नुकत्याच संपलेल्या दिव्यांगांच्या क्रिकेट विश्वकरंडकमध्ये भारताचा संघ विजेता ठरला आणि त्याक्षणी मला अजित वाडेकर सरांची तीव्र आठवण आली. बीसीसीआयच्या झेंड्याखाली दिव्यांगांचा संघ प्रथमच खेळत होता. या संघाने अतिशय चांगला खेळ केला. हा क्षण पाहण्यासाठी सर आज आपल्यात पाहिजे होते, असे मला वाटले. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिवस नुकताच होता. त्यामुळेही त्यांची आठवण तीव्रतेने आली. क्रिकेटमधील देदीप्यमान कामगिरीमुळे ते एक महान क्रिकेटर म्हणून जगात ओळखले जातात. क्रिकेट जगतात मिरविण्यापेक्षा त्यांनी आपले आयुष्य दिव्यांग (अपंग) क्रिकेटसाठी वाहून घेतले होते. ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज्डचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर डिसब्लेडमध्ये त्यांच्याबरोबर काम करताना दिव्यांग क्रिकेटपटूंसाठीची त्यांची तळमळ मी जवळून पाहिली. त्यांच्यातील माणुसकीचा वेगळेपणा मला वेळोवेळी अनुभवायला मिळाला.

त्यांच्याशी माझी पहिली भेट २०१३ मध्ये संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाली. दिव्यांग क्रिकेट आणि क्रिकेटपटूंचा विकास या अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना, मी सभेत बोलण्याची परवानगी मागितली. खरे तर, मी त्या सभेचा भाग नव्हतो तरीही सरांनी मला पुढे बोलावून माझे मत आणि त्यावरील पुढील योजना यावर सभेत बोलण्याची संधी दिली. मी माझे विचार मांडल्यावर सर एवढे खूष झाले आणि त्यांनी मला शाब्बासकी दिली. ते कौतुकाचे शब्द मला आजही दीपस्तंभासारखे वाटतात. मी माझे सर्व प्रामाणिक प्रयत्न पणाला लावून पुण्यात दिव्यांगांची क्रिकेट स्पर्धा यशस्वी करून दाखविली. त्यामुळे सरांचा आणि माझा ऋणानुबंध अजून घट्ट झाला. दिव्यांग क्रिकेट आणि खेळाडूंसाठी सरांनी आयुष्य पणाला लावले. दिव्यांग क्रिकेटला बीसीसीआयची मान्यता मिळावी म्हणून सरांनी खूप प्रयत्न केले. त्याचाच एक भाग म्हणजे नोव्हेंबर २०१४ मध्ये ते पुणे जिल्हा दिव्यांग क्रिकेट संघटनेच्या वार्षिक बक्षीस समारंभाला आले होते. संघटनेचे काम पाहिल्यावर त्यांना आनंद झाला होता. त्यांचे कौतुकाचे शब्द नेहमीच आठवणीत राहतील. त्यांनी केवढा विश्वास दाखविला आमच्यावर...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT