File Photo
File Photo 
मुंबई

अत्याचार करणाऱ्यास १० वर्षांचा तुरुंगवास

सकाळ वृत्तसेवा


नवी मुंबई : शेजारी राहणाऱ्या सहावर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या कैलाश गायकवाड (२७) या तरुणाला ठाणे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी १० वर्षे तुरुंगवास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ही घटना मे २०१६ मध्ये तळवळी गाव येथे घडली होती.

पीडित मुलगी व तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी कैलाश गायकवाड हे तळवली गाव परिसरात राहण्यास होते. मे २०१६ मध्ये पीडित मुलगी ही आपल्या मैत्रीणीसह सायंकाळच्या वेळी मंदिरात नैवेद्य दाखवून घरी परतत असताना, आरोपीने पीडित मुलीला जबरदस्तीने उचलून आपल्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केले होते.

पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून रबाळे पोलिसांनी आरोपी गायकवाडवर बलात्कारासह पोक्‍सो कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. ठाणे येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर सरकारतर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. विवेक कडू यांनी एकूण ६ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्यानुसार न्या. जाधव यांनी आरोपी कैलाश गायकवाड याला दोषी ठरवत १० वर्षे तुरुंगवास तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT