File Photo
File Photo 
मुंबई

अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावास

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : नागाव समुद्रकिनारी फिरण्यास आलेल्या पर्यटकाने त्याच ग्रुपमधील एका पर्यटक महिलेवर अत्याचार केला. या प्रकरणी अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास तसेच आरोपीला मदत करणाऱ्या दोघांना एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

श्रवणकुमार शर्मा (३२, सध्या रा. खारघर, नवी मुंबई) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा राजस्थान येथील रहिवासी आहे. तसेच सुमित चौधरी, रिचा चौधरी अशी आरोपीला मदत करणाऱ्या आरोपींची नावे असून दोघेही खारघर, नवी मुंबई येथील रहिवासी आहेत. हे तिघेही एकाच कंपनीतील असून श्रवणकुमार हा त्यांच्या कंपनीतील बॉस आहे.

पीडित तरुणी ही मूळची राजस्थानमधील आहे. ती महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. शिक्षणासाठी ती नवी मुंबईत सुमित चौधरी (आरोपी क्रमांक दोन) व रिचा चौधरी (आरोपी क्रमांक तीन) यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. २७ ऑगस्ट २०१५ रोजी पीडित तरुणी, दोन आरोपी व त्यांचा कंपनीतील बॉस असे चौघे नागाव येथील नाईक कॉटेजमध्ये वास्तव्यास राहिले.

पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास आरोपी श्रवणकुमार शर्मा याने त्या खोलीत घुसून पीडित तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर कोणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. पीडित तरुणीने अलिबाग पोलिस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT