मुंबई

शहरात आजपासून दहा टक्के पाणीकपात 

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई - गेल्या वर्षभरात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या मोरबे धरणातील पाण्याचा अतिवापर केल्यामुळे नवी मुंबईकरांवर पाणीकपातीची वेळ आली आहे. धरणातील पाणीसाठा मागणीपेक्षा कमी झाल्यामुळे मंगळवारपासून अभियांत्रिकी विभागामार्फत दहा टक्के पाणीकपातीला सुरुवात होणार आहे. सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत धरणातील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. दर आठवड्याच्या मंगळवारी पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. विशेष म्हणजे पाण्याच्या या उधळपट्टीमुळे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भर पावसाळ्यात शहरावर पाणीकपातीचे संकट आले आहे. 

190 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता असलेला नवी मुंबईच्या मोरबे धरणातील पाणीसाठा पाऊस लांबणीवर पडल्यामुळे आता आटला आहे. पावसाच्या प्रतीक्षेसोबतच अमर्यादित पाण्याची उधळपट्टी हेदेखील त्याला प्रमुख कारण ठरले आहे. राजकीय मनीषेपोटी सत्ताधाऱ्यांनी रहिवाशांवर मुक्त हस्ते केलेली पाण्याची उधळण आता सर्वांच्याच अंगलट आली आहे. 135 लिटर प्रति व्यक्ती प्रति दिनी असा नियम असताना महापालिकेने 235 ते 240 लिटर प्रति व्यक्‍ती प्रति दिनी एवढे पाणी दिल्यामुळे धरणाच्या पाणीपातळीने तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. या वर्षी धरणात चांगला पाऊस झाल्यानंतरही जून महिन्याच्या अखेरीस धरणातील पाणीसाठा अवघा 68.38 दशलक्ष घनमीटरपर्यंत येऊन ठेपला आहे. 2017 ला याच महिन्यात मोरबे धरणात 104.5986 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा शिल्लक होता. मात्र पाण्याचा दैनंदिन वापर वाढल्यामुळे शहरातील नागरिकांनी अगदी वाहने धुण्यापासून ते पाण्याच्या टाक्‍या भरून वाहिल्यानंतरही दुर्लक्ष केल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय झाला आहे. महापालिकेला शहरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी या वर्षी धरणात तब्बल 3 हजार 300 मिलिमीटर इतका पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र यंदा हवामान खात्याने धरणक्षेत्रात 2 हजार 800 मिलिमीटर इतका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलेला असल्यामुळे पाणीकपातीचे संकट वर्षभर राहण्याची शक्‍यता आहे. 

प्रशासकीय हालचालींना वेग 
शहरात पाणीकपात लागू केल्यानंतर सध्या उपलब्ध असलेल्या धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी शहरात सर्वाधिक पाण्याचा वापर करणाऱ्या सोसायट्या, वाणिज्य इमारती, मॉल्स आदी व्यवस्थापनांची माहिती मागवली आहे. या आठवड्यात अभियांत्रिकी विभागासोबत होणाऱ्या बैठकीत ही आकडेवारी सादर केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT