मुंबई

चिंता मिटली! दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू

मयूरी चव्हाण-काकडे

डोंबिवली : कोरोनाच्या संकटामुळे शालान्त परीक्षा रद्द करण्यात आल्याने अनेक प्राथमिक शाळांनी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास घेण्यास सुरुवात केली. मात्र नववी उत्तीर्ण होऊन आता दहावीत गेलेल्या सर्व विद्यार्थ्यांना दहावीचा अभ्यास करायचा कसा? असा प्रश्न पडला होता.

दहावी हा करिअरमधील महत्त्वाचा टप्पा मानला जात असल्याने पालक वर्गातही चिंतेत होते. लॉकडाऊनमुळे कुटुंबातील आर्थिक स्रोत घटल्याने ऑनलाईन पुस्तके खरेदी करणेही मुश्किल आहे. मात्र, यावर तोडगा काढून तरुण मंडळींनी दहावीच्या सर्व पुस्तकांचा संच 'पीडीएफ' स्वरुपात मोफत उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरीच राहून अभ्यासाला सुरुवात केल्याचे चित्र असून, यामुळे पालकवर्गालाही दिलासा मिळाला आहे.

दहावीचे वर्ष म्हटले की मुलांपेक्षा पालकच अभ्यासाचा जास्त धसका घेतात. नववीची परीक्षा संपताच विविध क्लास, शाळेतील जादा तास अशा एक ना अनेक गोष्टींचा राबताही सुरू होतो. कोरोनामुळे या सर्व गोष्टींना तूर्तास ब्रेक लागला असला तरी एका विशिष्ठ कालावधीनंतर शाळा सुरू होणार, हे निश्चितच आहे.

मात्र लॉकडाऊनमुळे पुस्तकांची दुकानेही बंद असल्याने विद्यार्थी आणि पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर दहावीची मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमाच्या जवळपास आठ पुस्तकांचा संच मोफत उपलब्ध करून देण्यासाठी बदलापूरमधील शिवसेनेचे युवा पदाधिकारी अॅड. तुषार साटपे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

याला पालकवर्गानेही उत्तम प्रतिसाद देत पुस्तकांचा संच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मागवून घरीच आपल्या पाल्याला ई-लर्निंगचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. अॅड. तुषार साटपे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आजवर सुमारे 500 विद्यार्थ्यांना मोफत ई-पुस्तकांचा संच दिला असून अनेक पालक पुस्तकांसाठी संपर्क साधत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी मोफत ई-पुस्तकांसाठी 9422666882 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे.

मोफत पुस्तक उपलब्ध झाल्याने घरीच विद्यार्थ्यांचा अभ्यास घेणे शक्य झाले आहे. अभ्यासाचा थोडा सराव राहिल्याने मुलांच्या बुद्धिमत्तेलाही खिळ बसणार नाही.
- हेमा पाटील, पालक 

भूगोल विषयाचे पुस्तक मी वाचायला सुरुवात केली आहे. यासाठी मी पालकांची मदत घेते. पुस्तके आधीच डोळ्याखालून गेली तर शाळा सुरू झाल्यावर अभ्यास सोपा होईल
- यामिनी वाघमारे, विद्यार्थिनी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2400 crore loss: आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा फटका बसतोय, पण कसा? मोदीने गणित समजावून सांगितलं

Arshdeep Singh Girlfriend: अर्शदीप सिंगची गर्लफ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री? एका टॅटूमुळे समोर आलं मिस्ट्री गर्लचं रहस्य, Viral Post

‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना रखडली, दीड हजार मुलींचे भवितव्य नावाच्या वादात

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील साबळेवाडी, शिंदेवाडी, खुपिरे परिसरात २४ शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबलची चोरी

कतरिनाच्या गाण्यावर गौतमीचा भन्नाट डान्स, एन्ट्री स्टेप पाहून नेटकरी थक्क, Viral Video

SCROLL FOR NEXT