मुंबई

अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडणार, दुसरी गुणवत्ता यादी लांबणीवर

तेजस वाघमारे

मुंबई:  सर्वोच्च न्यायलयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आदेशामुळे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शिक्षण विभागाने पुढे ढकलली आहे. यामुळे गुरुवारी सकाळी 10 वाजता जाहीर होणारी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार नाही. सरकारचे आदेश आल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत अंतिम निर्णय येईपर्यंत लागू करण्यात आलेले सर्व लाभ रद्द करण्याचे अंतरिम आदेश दिला आहे. इयत्ता अकरावीची पहिली गुणवत्ता यादी 30 ऑगस्टला जाहीर झाली. यानंतर आज सकाळी 10 वाजता दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. यासाठी मुंबई विभागातून एक लाख 49 हजार 12 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यातच न्यायालयाच्या निर्णयामुळे ही प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे अकरावीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने यापुढील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेची सदर कार्यवाही पुढे ढकलण्यात येत आहे असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेचे सुधारीत वेळापत्रक शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात अकरावी प्रवेशसाठी 12 टक्के मराठा आरक्षण लागू करण्यात आले आहे. यानुसार मुंबई विभागात पहिल्या फेरीसाठी 17844 जागा उपलब्ध होत्या. या जागांवर 2923 अर्ज आलेत त्यापैकी 2788 विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले होते.

-------

(संपादनः पूजा विचारे)

11th admission process delayed second quality list will be extended

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Letter : बाळासाहेब, पवार साहेब, महाजन यांनी कोणालाच पाठीशी घातल नाही; राज ठाकरेंची फडणवीसांवर 'सत्तेचा माज, मौनावर' कठोर शब्दांत टीका

IND vs ENG 2nd T20I: तो परतला, आता काय खरं नाय... इंग्लंडच्या Playing XI मध्ये २ बदल; भारताला टक्कर देण्यासाठी तगडा संघ जाहीर

Latest Marathi Live Update: संत मुक्ताबाईंच्या पालखीचे मराठवाड्यात उत्साहात स्वागत

Sugar Factory : साखरेतील सहकाराचा गोडवा ओसरला; १६ पैकी चार कारखाने बंद, दोन भाडेपट्ट्यावर

राम मंदिर दानचोरी : आता जमिनीवर बसून मोजणी होणार, कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेस कोड; ट्रस्टचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT