मुंबई

अकरावीच्या प्रवेशाला मुदतवाढ, अर्ज करण्याची उद्या शेवटची संधी

संजीव भागवत

मुंबई:  शिक्षण संचालनालयाकडून अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य फेरी- 2 ला 16 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना या मुदतीत आपल्या आवडीच्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करण्याची आणखी एक संधी मिळाली असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली.

13 फेब्रुवारीपर्यंत अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती. मात्र मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी शहरांमध्ये असलेल्या महाविद्यालयात अर्ज भरताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे अनेकांचे प्रवेश पूर्ण होऊ शकले नव्हते. त्यामुळे प्रवेशापासून दूर राहिलेल्या  विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा यासाठी विद्यार्थ्यांना 16 फेब्रुवारीपर्यंत प्रवेश अर्ज भरण्यास तसेच आपल्या आवडीच्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.

या विशेष फेरीच्या प्रवेश प्रक्रिया दरम्यान 'ज्या विद्यार्थ्यांना आपला प्रवेश रद्द करायचा आहे त्यांना 15 फेब्रुवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत करता येणार आहे. त्यानंतर त्यांना उपलब्ध असलेल्या जागा नुसार आपल्या आवडीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत  ऑनलाईन प्रवेश अर्ज करू शकतात. 

तसेच ज्या महाविद्यालयांसाठी अर्ज केला तेथील प्रवेश निश्चित झाल्यानंतर  संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थी आपला प्रवेश घेऊ शकतात. मात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाची ही अखेरची संधी असल्याने  या देण्यात आलेल्या मुदतीमध्ये आपले प्रवेश निश्चित करावे, अन्यथा त्यासाठी कोणालाही जबाबदार धरता येणार नाही, याची खबरदारी पालक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

11th online admission till February 16 extended the first priority round 2

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Labour Law: 1 तास काम, 2 तासांचा पगार! काय आहे ओव्हरटाइमवर नवीन कामगार कायद्यातील नियम

Canva AI 2.0 लॉन्च! डिझाइनिंग वर्ल्डमध्ये धमाका; 20 पेक्षा जास्त जबरदस्त टूल्स, कसे वापरायचे? पाहा

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, तापमानाचा पारा ४४ अंशावर तरी शाळा सुरूच

IND vs SA: स्मृती मानधानाने रोहित शर्मा-विराट कोहलीला मागे टाकत घडवला नवा इतिहास; T20I मध्ये ठरली अव्वल भारतीय फलंदाज

Kolhapur Gokul Dudh Sangh Clash : दिव्यांग लिपिकाला सभासदांची धक्काबुक्की; 'गोकुळ' सुनावणीला गालबोट; अधिकारी गैरहजर असल्यामुळे तणाव

SCROLL FOR NEXT