कोविड सेंटर esakal
मुंबई

कोविडच्या तीसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 12 जंम्बो कोविड सेंटर

वरळीतील पोद्दार रुग्णालयात वैद्यकिय प्राणवायू निर्मीती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोविडच्या तीसऱ्या लाटेच्या पाश्‍र्वभुमीवर 12 जंम्बो कोविड केंद्रांसह वरळीतील पोद्दार रुग्णालयात वैद्यकिय प्राणवायू निर्मीती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आज स्थायी समितीत मंजूर झाला आहे.प्रत्येक मिनीटाला 1 लाख 3 हजार लिटर प्राणवायूची निर्मीती केली जाणार आहे.यासाठी महानगर पालिका सुमारे 200 कोटी रुपये खर्च करणार आहे.मात्र,या प्रकल्पातून निर्माण होणार प्राणवायू अतिदक्षता तसेच व्हेंटीलेटवर वरील रुग्णांना वापरता येणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महानगर पालिकेने या पुर्वी 16 रुग्णालयात प्राणवायू निर्मीती प्रकल्प उभारण्याचे काम सुरु केले आहे. हे काम जुलै महिन्यात पुर्ण होणे अपेक्षीत होते.मात्र,काही ठिकाणी अद्याप हे काम पुर्ण झालेले नाही. त्यातच आता पोद्दार रुग्णालय 12 जंम्बो कोविड केंद्रातही प्राणवायू निर्मीती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या कामाला आज स्थायी समितीने मंजूरी दिली.कार्याध्येश मिळाल्यानंतर 75 दिवसात हा प्रकल्प उभारायचा आहे. तसेच,तीन वर्ष याची देखभालही करायची आहे.यासाठी महानगर पालिका सुमारे 200 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.

अतिदक्षता विभाग तसेच व्हेंटीलेटरवरील रुग्णांना उच्च दाबाने प्राणवायू पुरवावा लागतो. मात्र,या प्रकल्पातून तेवढ्या दाबाने प्राणवायू पुरता येणार नाही.त्यामुळे येथे तयार होणार प्राणवायू गंभिर आणि अतिगंभिर रुग्णांसाठी वापरता येणार नाही.अशी शक्यता वर्तवली जात आहे.हा प्राणवायू गंभिर नसलेल्या परंतु कृत्रिम प्राणवायूची गरज असलेल्या रुग्णांना पुरवता येणार आहे.

कमी दराने निवीदा

हायवे कंस्ट्रक्शन कंपनी आणि जी.एस.एन असोशिएटस या दोन कंपन्यांना हे काम देण्यात आले आहे.मात्र,पालिकेच्या अंदाजित दरा पेक्षा कमी किंमतीत हे काम होणार असल्याने कामाच्या दर्जावर प्रश्‍न निर्माण होणार आहे.

येथे होणार प्रकल्प

एन.एन.सी.आय वरळी,दहिसर कांदरपाडा,क.जे.सोमय्या मैदान चुनाभट्टी,बीकेसी फेज 1,बीकेसी फेज 2,दहिसर चेक नाका,गोरेगाव नेस्को,कांजूरमार्ग,मुलूंड रिचर्डस ॲन्ड क्रुडास,मालाड,रेसकोर्स,भायखळा रिचर्ड ॲन्ड क्रुडास या जंम्बो कोविड केंद्रासह वरळीतील पोद्दार रुग्णालयात हे प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT