Mumbai
Mumbai 
मुंबई

मुंबईतील इमारत दुर्घटनेत 07 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : डोंगरी परिसरात एका चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 07 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

डोंगरी परिसरातील केसरबाई या 4 मजली इमारतीचा अर्धा भाग आज (मंगळवार) सकाळी कोसळला. या  इमारतील एकूण 10 कुटुंबे राहत होती. यातील 30 ते 40 जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर विखे पाटील यांनी या दुर्घटनेत 07 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. 

कोसळलेली इमारत निवासी असल्याचे समजते. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर करण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अब्दुल हमीद दर्ग्याच्या शेजारी असलेली केसरबाई इमारत सकाळी साडे अकराच्या सुमारास कोसळली. या घटनेची माहिती स्थानिकांनी आपत्कालीन विभागाला दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT