घर का न घाट का... उन्मुक्त चंदचं ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

USA Squad for T20 World Cup : 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी USA ने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली.
USA Squad for T20 World Cup
USA Squad for T20 World Cup sakal

USA Squad for T20 World Cup : 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी USA ने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. प्रथमच अमेरिका संयुक्तपणे वेस्ट इंडिजसोबत आयसीसी स्पर्धेचे आयोजन करणार आहे. 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या मेगा स्पर्धेसाठी अमेरिकेने भारतीय वंशाच्या मोनांक पटेलकडे संघाचे कर्णधारपद दिले आहे.

USA Squad for T20 World Cup
India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी अमेरिकेचा 15 सदस्यीय संघ : मोनांक पटेल (कर्णधार), आरोन जोन्स (उप-कर्णधार), अँड्रिज गॉस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नॉस्तुश केंजिगे, सौरभ नेत्रावलकर, शेडली व्हॅन शेल्क्विक, स्टीव्हन टेलर , शायन जहांगीर.

USA Squad for T20 World Cup
Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

आपल्या क्रिकेट कारकिर्दीला उंच घेऊन जाण्याच्या उद्देशाने भारतातून अमेरिकेत आलेला टीम इंडियाचा अंडर-19 संघाचा कर्णधार असलेल्या उन्मुक्त चंदला संघात स्थान मिळाले नाही. त्याच वेळी, 2012 मध्ये उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता. न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या कोरी अँडरसनला यूएसए संघात स्थान मिळाले आहे.

USA Squad for T20 World Cup
MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

त्याचबरोबर 2010 च्या वर्ल्ड कप भारतीय अंडर-19 संघात सहभागी झालेल्या सौरभ नेत्रावलकरलाही स्थान मिळाले आहे. उल्लेखनीय आहे की 2010 मध्ये झालेल्या 19 वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत सौरभ नेत्रावलकर भारतीय अंडर-19 संघाचा भाग होता. आणि त्यावेळी भारतीय अंडर-19 संघाला विजेतेपद मिळवता आले नव्हते पण सौरभने भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या.

भारत, पाकिस्तान, आयर्लंड आणि कॅनडासह अमेरिकेला ब गटात ठेवण्यात आले आहे. अमेरिका 2 जून रोजी कॅनडाविरुद्ध मोहीम सुरू करणार आहे. यानंतर त्यांचा सामना 6 जूनला पाकिस्तानशी, 12 जूनला भारत आणि 14 जूनला आयर्लंडशी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com