crime  sakal
मुंबई

Crime News : पंचतारांकित हॉटेलमध्ये 12 वर्षीय मुलीचा विनयभंग

12 वर्षीय मुलीचा एका व्यक्तीने विनयभंग केल्या प्रकरणी एका आरोपीला अटक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू असताना एका 12 वर्षीय मुलीचा एका व्यक्तीने विनयभंग केल्या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुलगी तिच्या पालकांसह हॉटेलमध्ये आली होती. 29 वर्षीय आरोपीही तिथे उपस्थित होता . रविवारी पहाटे 3 च्या सुमारास मुलगी आणि आरोपी डान्स फ्लोअरवर होते.

तेव्हा आरोपीने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. मुलीने याबाबत तिच्या पालकांना माहिती दिली .पालकांनी हॉटेल कर्मचाऱ्यांना या बाबत तक्रार केली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी आरोपीला जाब विचारला. त्यावेळी उडवा उडवी करत आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

तरीही होत कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून ठेवले आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.तक्रारीच्या आधारे, आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता च्या कलम 354 (महिलेवर अत्याचार किंवा गुन्हेगारी बळजबरी) आणि लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT