मुंबई

अंगावर काटा आणणारी बातमी ! मुलांवर बारीक लक्ष ठेवा, नाहीतर १२ वर्षीय सुमितसारखं व्हायला वेळ लागत नाही...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : पावसाळा सुरु झालाय. अशात गेले काही दिवस मुंबईत तुफान पाऊस झालाय. पण पावसाळ्यात पालकांनो तुमचं तुमच्या पाल्यांवर लक्ष आहे ना? कारण पावसाळा मुलांचा आनंदाचा ऋतू. पावसात भिजावं, कुठेतरी फिरायला जावं असं मुलांना वाटतं. त्यामुळे पालकांनी मुलांवर जरा जास्त लक्ष ठेवायची आता गरज आहे. कारण अशाच थोड्याश्या दुर्लक्षामुळे भिवंडीत होत्याचं नव्हतं झालंय.   

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तुफान पाऊस पडतोय. याच पावसामुळे साठलेल्या पाण्यात बुडून १२ वर्षाच्या चिमुरड्याचा जीव गेलाय. भिवंडीतील अशोक नगर भागात एक कन्स्ट्रक्शन साईट आहे. या कन्स्ट्रक्शन साईटवर बिल्डरने कंपाउंड केलेल्या जागेतील मोठ्या खड्ड्यात पावसाचं पाणी साचलं होतं. छान पाऊस आणि त्या खड्यात साठलेल्या पाण्यात पोहण्याचा मोह १२ वर्षीय सुमित गुप्ताला आवरला नाही.

त्याने त्या पाण्यात उडी घेतली. मात्र खड्डा खोल असल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्यामध्ये बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत अग्निशमन दलाला माहिती मिळताच सुमितला बाहेर काढण्यात आलं. त्याचं शवविच्छेदन देखील करण्यात आलं. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय. सोबतच या परिसरातील नागरिकांनी आता बिल्डरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीये. 

मुंबई आणि आसपासच्या परिसरात गेले काही दिवस पावसाने धुमशान घातलंय. अशात भिवंडी परिसरातील मुसळधार पावसामुळे कामवारी नदीला पूर आला आहे.

12 years sumit drowns in the pond at construction site at bhiwandi

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT