125 feet statue of Dr Babasaheb Ambedkar sakal
मुंबई

Dr Babasaheb Ambedkar : 14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ फुटाच्या पुतळ्याचे अनावरण

ऍड. प्रकाश आंबेडकर यांची राहणार प्रमुख उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तेलंगणा राज्याची राजधानी असलेल्या हैद्राबाद मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ फुटांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. जगभरातील आंबेडकरांच्या पुतळ्यांपैकी हा सर्वाधिक उंच असलेला पुतळा ठरणार असून, बाबासाहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने १४ एप्रिल रोजी या पुतळ्याचे भव्य सोहळ्यात अनावरण केले जाणार आहे.

या भव्य पुतळ्याचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री के.सी. राव हे देखील उपस्थित राहणार आहेत.

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.सी. राव यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मानला जात होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा भव्य पुतळा देशातील सर्व जनतेला प्रेरणा देणारा असेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री के.सी.राव यांनी दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील सर्वात मोठे भव्य स्मारक हे ठरेल. याची उंची १२५ फूट असून याचे सर्व काम पूर्ण झाले आहे. हैद्राबाद शहराच्या मध्यभागी असलेल्या हुसेन सागर तलावाजवळ ११.४ एकरात दीडशे कोटी रुपये खर्चून हे स्मारक उभारण्यात आले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा केवळ तेलंगणातील लोकांसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान असणार आहे. याशिवाय डॉ.आंबेडकरांचे जीवन व कार्य येथे संग्रहालय, छायाचित्र गॅलरी आणि ग्रंथालयाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्याजवळ ध्यान केंद्र आणि सभामंडपही बांधण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT