महाड :  अचानक आलेल्‍या पावसामुळे दासगावजवळ खासगी बसचा रस्‍त्‍यावरून घसरून अपघात झाला.
महाड : अचानक आलेल्‍या पावसामुळे दासगावजवळ खासगी बसचा रस्‍त्‍यावरून घसरून अपघात झाला. 
मुंबई

दासगावजवळ बस अपघातात १५ जण जखमी

सकाळ वृत्तसेवा

महाड (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव गावाजवळ एक खासगी बस रस्त्याकडेला घसरून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (ता. २४) सायंकाळी ५.३०च्या सुमारास घडली.

अपघातातील ही खासगी बस पोलादपूरहून मुंबईला निघाली होती. पोलादपूर तालुक्‍यातील देवळे गावात मुंबईहून आलेले हे प्रवासी उत्तरकार्य आटोपून परत जात होते. त्या वेळी हा अपघात घडला. दासगावनजीक ही बस अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावरून घसरली. बसमधील जखमी प्रवाशांना दासगावमधील स्थानिक नागरिकांनी तत्काळ बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि महाड ट्रामा सेंटरमध्ये जखमींना दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात चालक दीपक चिकने, बळीराम जाधव, रवींद्र केसरकर, महादेव केसरकर, शंकर मुर्डे यांच्यासह जवळपास १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT