Mumbai local
Mumbai local 
मुंबई

रेल्वेचे बिघाडसत्र कायम! हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गेले चार दिवस सतत मध्य रेल्वेचे बिघाडसत्र सुरू असतानाच शनिवारी सकाळी पुन्हा हार्बर मार्गावरील जुईनगर ते नेरूळदरम्यान पॉइंट फेलमुळे बिघाड झाला. परिणामी, शनिवारी (ता. 8) सलग पाचव्या दिवशीही प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला.

हार्बर मार्गावरील जुईनगर ते नेरूळ स्थानकांदरम्यान सकाळी 10.15 वाजता पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गात गर्दुल्ल्यांनी रेल्वे रुळाच्या पॉइंटमध्ये लोखंडी खिळा टाकल्यामुळे अप मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली. 

हा बिघाड 10.25 वाजता दुरुस्त करण्यात आला; मात्र तरीही या मार्गावरील लोकल अर्धा तास उशिराने धावत होत्या. याचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. पनवेलहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकलची वाहतूक 30 मिनिटे उशिराने सुरू होती. गेले चार दिवस मध्य रेल्वे उशिरा धावत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

पावसाळ्यात लोकल रखडू नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासन सज्ज असले, तरी सध्या लोकलच्या सततच्या बिघाडामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. मध्य रेल्वे मार्गावर पाणी तुंबण्याची समस्या होत असून सहा ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी तुंबते. या भागातून पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपांच्या संख्येत वाढ केली आहे. 

गेल्या चार दिवसांतील बिघाड 
- 4 जूनला सायन ते माटुंगादरम्यान ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी पडली 
- 5 जूनला ईदच्या दिवशी डोंबिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड 
- 6 जूनला सकाळी 6 च्या सुमारास खडवलीजवळ रुळाला तडा 
- 7 जूनला तांत्रिक बिघाडामुळे हार्बर आणि ट्रान्स हार्बर उशिरा 
- 8 जूनला पॉइंट फेलमुळे जुईनगर ते नेरूळदरम्यान लोकल अर्धा तास उशिरा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT