File Photo
File Photo 
मुंबई

गोविंदांना नेत्यांचे विमाकवच

उत्कर्षा पाटील

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा गोविंदांना विमा कवच मिळण्यासाठी पायपीट करावी लागत नसल्याचे चित्र दिसत आहे. नेते मंडळी स्वत:हून पुढाकार घेत विमा काढून देत आहेत. आतापर्यंत १९२ मंडळांच्या गोविंदांचा विमा उतरवला असून त्यातील ७८ मंडळांच्या गोविंदाना नेत्यांनी विमा कवच दिले आहे.

मुंबईमधील दादर, भायखळा, वरळी, मुलुंड, अंधेरी, गिरगाव या विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी गोविंदांना आर्थिक साहाय्य करत आहेत. 
मुंबई उच्च न्यायालयाने प्रत्येक गोविंदा पथकांना विमा उतरवणे बंधनकारक केले आहे. इंडियन ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी १० लाखांचा विमा कवच देते. त्यासाठी प्रत्येक गोविंदाला ७५ रुपये प्रीमियम भरावा लागतो.

मागील वर्षी ४४ हजारहून अधिक गोविंदांनी विमा काढला; तर या वर्षी केवळ मुंबई नाही तर पुणे, रत्नागिरी, गडहिंग्लज असे राज्याभरातून विम्यासाठी चौकशी केली जात आहे. या वर्षी विधानसभा निवडणुकींच्या तारखा येत्या काही दिवसांत जाहीर होतील. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक विभागातील नेत्यांनी सण-उत्सवातून आपला जम बसावयला सुरुवात केली आहे.

वडाळा येथील आमदार कालिदास कोळंबकर यांनी दादर भागातील तर गिरगावमधून शिवसेनेचे पांडुरंग सकपाळ काही गोविंदा पथकांचे विमे काढत आहेत. मलबार हिल परिसरातील गोविंदा पथकांना आमदार मंगलप्रभात लोढा, भायखळा परिसरातील गोविंदा पथकांचे बेस्ट स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी गोविंदा पथकांचा विमा उतरवला आहे.

वरळीतून आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर; तर मुलुंडमधून भाजपचे खासदार मनोज कोटक गोविंदांचा विमा उतरवणार आहेत. तसेच अंधेरी, जोगेश्‍वरी, बोरिवली या भागातून लोकप्रतिनिधी गोविंदांच्या विमासाठी पुढाकार घेत आहेत.

उतरवलेला विमा 
मंगलप्रभात लोढा    ४६ मंडळ    ३००० गोविंदा
यशवंत जाधव     ३२ मंडळ    १८५० गोविंदा

गोविंदांचा विमा काढण्यासाठी राजकीय नेते मदत करत आहेत. भायखळा मतदारसंघातील सर्व गोविंदा पथकांचे विमा यशवंत जाधव यांनी काढले. आता कार्यक्रमस्थळीचा विमा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- बाळा पडेलकर,
अध्यक्ष, दहीहंडी उत्सव समन्वय समिती

मंगलप्रभात लोढा यांनी परिसरातील गोविंदांचा विमा उतरवला आहे. मनोज कोटक व भाई जगताप यांनी त्यांच्या परिसरातील गोविंदांचे विमा काढण्यासाठी विचारणा केली. दापोली, कोल्हापूर, सातारा, गोवा येथून विम्याबाबत चौकशी होत आहे.
- सचिन खानविलकर

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT