Mumbai Crime News Sakal
मुंबई

Lalbaug Mother Murder : आईचे तुकडे केले, मृतदेहाचा वास लपवण्यासाठी १०० परफ्युम विकत घेतले!

या खुनाप्रकरणी २२ वर्षीय मुलीला अटक करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईत आपल्या आईची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय मुलीला अटक केली आहे. या मुलीने आपल्या आईच्या मृतदेहाचे तुकडे करुन कपाटात भरुन ठेवले होते. या प्रकरणी पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे होत आहेत.

मृत महिलेचं नाव वीणा जैन असं असून तिचा खून तिच्याच सख्ख्या मुलीने केला आहे. रिंकल जैन असं तिचं नाव आहे. आईच्या हत्येनंतर मेडिकलमधून १०० परफ्युमच्या बाटल्या आणि एअर फ्रेशनर्स खरेदी केल्याचं या मुलीने कबुल केलं आहे. मृतदेहाची दुर्गंधी येऊ नये म्हणून तिने हे खरेदी केले होते.

रिंकलने आपल्या आईच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले. ते प्लास्टिकच्या पिशवीत भरून ही पिशवी कपाटात ठेवली. बराच काळ वीणा यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांच्या भावाला संशय आला. त्यानंतर त्याला संशय आला. घरातूनही उग्र वास येऊ लागला. त्यानंतर त्याने पोलिसांना कळवलं आणि या खुनाचा उलगडा झाला.

पोलीस तपासात रिंकलनेच रोजच्या घरगुती वादांना कंटाळून आपल्या आईचा खून केल्याचं समोर आलं. रिंकलने खुनाची कबुलीही दिली आहे. तिने सांगितलं की, आईचा खून केल्यावर तिने मृतदेह कापला. तेव्हापासून ती दिवसभर घराच्या खिडकीत उभी राहायची आणि लालबाग जंक्शनवरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनावर लक्ष ठेवायची. तिला कशातही रस नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT