donate organs sakal
मुंबई

मुंबईत 23 वे अवयवदान; 4 जणांचा जीव वाचला

मुंबईत अवयवदानाला प्रतिसाद या वर्षातील 23 वे अवयवदान झाले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत अवयवदानाला प्रतिसाद मिळत असुन नुकतेच यावर्षातील 23 वे अवयवदान झाले. अपोलो रुग्णालयात 17 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या अवयव दानामुळे 4 जणांना जीवनदान मिळाले आहे.मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना तेथील डॉक्टर आणि प्रत्यारोपणाच्या समन्वयकांनी कुटुंबियांना अवयवदानाबद्दल माहिती दिली असता महिलेच्या कुटुंबीयांनी तात्काळ होकार दिल्याचे समन्वय समितीने सांगितले.

डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत मायताचे यकृत, स्वादुपिंड आणि दोन मूत्रपिंडाचे दान करता येतील अशी माहिती विभागीय अवयवदान आणि प्रत्यारोपण समितीला दिली. त्यानंतर या समितीने मार्गदर्शक तत्त्वे आणि निकषांनुसार दान आणि प्रत्यारोपण प्रक्रिया पार पाडली. मात्र अवयव दात्याच्या कुटुंबीयांनी माहिती झेडटीसीसीने गुप्त ठेवली आहे. यावर्षीच्या हे 23 वे अवयवदान आहे. यातून 75 अवयवाचे दान झाले आहे.

अवयवदानाबद्दल लोकांमध्ये जागृती होत आहे. कोरोना नियंत्रणात येत असल्याने अवयवदान टप्प्याटप्प्याने वाढत आहे. या अवयावदानामुळे चार जणांचे जीव वाचवण्यास मदत झाली आहे अशी माहिती मुंबई विभागीय अवयवदान आणि प्रत्यारोपण समितीचे डॉ. एस.के. माथूर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये हनुमान जयंती निमित्ताने 51 फूट उंच मारुती च्या दर्शनाला गर्दी

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT