26 stray dogs died after denied feeding FIR against two 
मुंबई

Mumbai Stray Dogs : उपासमार अन्... 26 भटक्या कुत्र्यांच्या मृत्यूचं कारण आलं समोर; महिला अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

starving 26 stray dogs to death : मुबईत २६ भटक्या कुत्र्यांचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित कणसे

गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये २६ भटक्या कुत्र्यांचा मृत्यूप्रकरणी वनराई पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला अधिकारी तसेच सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेस्को सेंटरमधील भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यास मज्जाव केल्यानंतर उपासमारीमुळे या कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप प्राणी प्रेमी जोडप्याने केला आहे.

प्राण्यांसाठी काम करणाऱ्या एका जोडप्याने कुत्र्यांच्या मृत्यू प्रकरणात तक्रार दिली आहे. या जोडप्याने त्यांच्या तक्रारीत सांगितलं की, ते जवळपास एक वर्षापासून नेस्को कंपाउंडमधील ३५ ते ४० भटक्या कुत्र्यांना स्वतःच्या पैशांनी खायला घालत आहेत. मात्र मागील तीन ते चार महिन्यांपासून त्यांना या कपाउंडमध्ये प्रवेश नाकारण्यात येत आहे. त्यामुळे या कुत्र्यांची उपासमार झाली.

जेव्हा आम्ही आजारी कुत्र्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका घेऊन आलो तेव्हा त्या वाहनाला देखील नेस्को कंपाउंडमध्ये प्रवेश नाकारण्यात आला, असेही या जोडप्याने त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.

एफआयआरमध्ये सांगण्यात आले आहे की, २२ जुलै रोजी नेस्को प्रशासनाने त्यांना चर्चेसाठी बोलवलं. मात्र त्यांनी कुत्र्यांना खायला घालणे किंवा परिसरात प्रवेश नाकारला.

प्राण्यांसाठी काम करणारा गट, पीएएल फाउंडेशनच्या सदस्य वकिलांच्या मदतीने या जोडप्याने गुन्हा दाखल केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT