crime esakal
मुंबई

Mumbai Crime : 3 वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलाकडून अत्याचार; मुलाची बालसुधारगृहात रवानगी

लपंडाव खेळण्याच्या निमित्ताने 3 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला आरे पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - लपंडाव खेळण्याच्या निमित्ताने 3 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला आरे पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली आहे. अटकेनंतर आरोपी मुलाची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पीडित मुलगी 3 वर्षे 10 महिन्यांची आहे.

आरोपीने यावर्षी ऑगस्टमध्ये पहिल्यांदा पीडित मुलीला लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने बोलावून अश्लील कृत्य केले होते. त्यानंतर 9 ऑक्टोबरला पुन्हा आरोपीने खेळण्यासाठी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच मुलीला या घटनेबाबत कुठेही वाच्यता न करण्याची ताकीद आरोपीने मुलीला दिली. परंतु मुलीने या घटनेची माहिती आपल्या आईला दिली.

अखेर पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुरुवारी गुन्हा दाखल करत आरोपी मुलाला अटक केली. आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT