Ghol Ganpati Temple Sheel Daighar Police esakal
मुंबई

गो रक्षक बनले भक्षक? घोळ गणपती मंदिर परिसरात 30 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार करुन निर्घृण हत्या

मंदिर परिसरातील गोशाळामध्ये सेवा करणाऱ्या दोन संशयित सेवकांना ताब्यात घेण्यात आले.

सकाळ डिजिटल टीम

सदर महिला सकाळी शुद्धीवर आल्यावर तिने आरडाओरडा केला व ती पळून जात असताना आरोपींनी महिलेस मारहाण केली. तसेच तिचे डोके जमिनीवर आपटून गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली.

कळवा : शीळ गावातील घोळ गणपती मंदिर (Ghol Ganpati Temple) परिसरात एका 30 वर्षीय विवाहित महिलेवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिचे डोके जमिनीवर आपटून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील शाम सुंदर शर्मा(वय 62), संतोषकुमार मिश्रा (वय 45), राजकुमार पांडे (वय 45) या आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती शीळ डायघर पोलीस ठाण्याचे (Sheel Daighar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शीळ गावातील घोळ गणपती मंदिर परिसरात 30 ते 32 वर्षीय महिलेचा (Woman) मृतदेह आढळल्याची तक्रार शीळ डायघर पोलिसांत दाखल झाली होती, त्यानुसार शीळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाने तीन पोलीस पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला असता, मंदिर परिसरातील गोशाळामध्ये सेवा करणाऱ्या दोन संशयित सेवकांना ताब्यात घेण्यात आले.

पोलीस ठाण्यामध्ये त्यांना आणून सखोल चौकशी केली असता, मुंबईत राहणाऱ्या श्याम सुंदर शर्माच्या मदतीने त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर शीळ डायघर पोलिसांनी नवी मुंबई परिसरातील जवळच्या पोलीस ठाण्यात या संदर्भात चौकशी केली असता, मृत महिलेच्या वडिलांनी ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार, नवी मुंबई येथील सदर मृत महिला अक्षता कुणाल म्हात्रे (वय 30) घरगुती वादविवादाने तणावात होती. या तणावातून शनिवारी (ता. 6) सकाळी 10 वाजता ती शीळ गाव परिसरातील घोळ गणपती मंदिरात गेली होती. सदर महिला मंदिरातून परत न येता तिथेच थांबली होती. याच परिसरात वरील आरोपी दारू पीत बसले होते. सदर महिला एकटी असल्याने तिच्या परिसरात हे आरोपी दारू पीत बसले होते.

दरम्यान, महिला एकटी असल्याने तिच्याशी गोड बोलून तिला चहात भांगेच्या गोळ्या मिसळून चहा प्यायला दिला. ती नशेत गेल्यावर तिच्यावर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला. सदर महिला सकाळी शुद्धीवर आल्यावर तिने आरडाओरडा केला व ती पळून जात असताना आरोपींनी सदर महिलेस मारहाण केली. तसेच तिचे डोके जमिनीवर आपटून गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शीळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या सूचनेनुसार गुन्हे अन्वेषण पथकाने आरोपींवर कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT