34th road safety campaign school students organized rally to raise public awareness rto traffic police Sakal
मुंबई

Badlapur News : ३४ व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी संचलन रॅली काढत केली जनजागृती!

पथनाट्य, मोफत हेल्मेट वाटप, हेल्मेट रॅली, विविध शाळांमध्ये जाऊन, विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन या ना अनेक विविध सामाजिक उपक्रमाच्या आधारे बदलापूर शहरांत वाहतूक विभागाच्या वतीने ३४ व्या रस्ता सुरक्षा अभियान सुरु आहे.

सकाळ वृत्तसेवा

- मोहिनी जाधव

बदलापूर : पथनाट्य, मोफत हेल्मेट वाटप, हेल्मेट रॅली, विविध शाळांमध्ये जाऊन, विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन या ना अनेक विविध सामाजिक उपक्रमाच्या आधारे बदलापूर शहरांत वाहतूक विभागाच्या वतीने ३४ व्या रस्ता सुरक्षा अभियान सुरु आहे. या अनुषंगाने काल बदलापूर शहरातील अनेक शाळांतील मुलांच्या व शिक्षकांच्या मदतीने, पथसंचलन रॅली काढून वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी वाहतूकदारांना आवाहन करण्यात आले.

सद्य स्थितीला वाढती वाहने, त्यातून वाहतूक नियमांची होणारी पायमल्ली व त्यातून वाढते अपघात याची शृंखला सुरुच आहे. यावर कुठेतरी आळा बसावा या हेतूने, वाहतूक विभाग अंबरनाथ उपविभाग यांच्या वतीने बदलापूर शहरात गेल्या महिनाभरापासून विविध सामाजिक उपक्रम राबवत वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यात आली.

याच माध्यमातून बदलापूर हायस्कूल, नाईक विद्यालय येथे मोफत हेल्मेट वाटप, सन राईज विद्यालय येथे संबंधित विषयांवर चित्रकला स्पर्धा, जाणकार व्यक्तींकडून मार्गदर्शन, व काल शहरात अनेक शाळांतील जवळपास १२५ विद्यार्थ्यांच्या वतीने संचलन रॅली काढण्यात आली. यावेळी चौकाचौकात जाऊन विद्यार्थ्यांनी वाहतूक चालकांना वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी आवाहन केले.

वाहतूक विभागाच्या या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. या सगळ्यात उपक्रमांच्या वेळी अंबरनाथ वाहतूक उपविभागाचे पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर, पोलीस उपनिरीक्षक वाळू लबडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण राणे, किरण जिरे तसेच वाहतूक विभागाचे सर्वच अंमलदार, वॉर्डन यांनी विशेष मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT