Paschim Railway Mumbai esakal
मुंबई

Paschim Railway : पश्चिम रेल्वेवर फुकटे वाढले! दोन महिन्यात तब्बल 38 कोटी 3 लाखांचा दंड वसूल

उपनगरीय लोकलसह लांब पल्याच्या मेल-एक्सप्रेसमध्ये देखील विना तिकिट प्रवासी प्रवास करतात.

सकाळ डिजिटल टीम

तिकिट खिडक्यांवरील गर्दी, सुट्ट्या पैशांची चणचण तर कधीकधी उशिर होत असल्याने प्रवासी विनातिकिट प्रवास करतात.

मुंबई : पश्चिम रेल्वेवर गेल्या दोन महिन्यात विना तिकिट प्रवास करणार्‍यांकडून ३८ कोटी ३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये एसी लोकलमधून (AC Local) प्रवास करणाऱ्या साडे आठ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल २९ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेकडून (Western Railway) सांगण्यात आला आहे.

तिकिट खिडक्यांवरील गर्दी, सुट्ट्या पैशांची चणचण तर कधीकधी उशिर होत असल्याने प्रवासी विनातिकिट प्रवास करतात. अशा प्रवाशांवर रेल्वेच्या टिसीद्वारे कारवाई केली जाते. उपनगरीय लोकलसह लांब पल्याच्या मेल-एक्सप्रेसमध्ये देखील विना तिकिट प्रवासी प्रवास करतात. पश्चिम रेल्वेच्या तिकीट (Railway Ticket) तपासणी पथकाने एप्रिल ते मे २०२४ या दोन महिन्यांत अनेक तिकीट तपासणी मोहिमेचे आयोजन केले होते.

यात ३८ कोटी ०३ लाखांचा दंड विना तिकिट प्रवाशांकडून वसूल करण्यात आला. मे २०२४ मध्ये बुक न केलेल्या सामानाच्या प्रकरणांसह २.८० लाख तिकीटविहीन/अनियमित प्रवाशांचा शोध घेऊन १७.१९ कोटी दंड वसूल करण्यात आला. तसेच, मे महिन्यात, पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरी विभागातील १ लाखांहून अधिक प्रकरणे शोधून ४.७१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.

दरम्यान, एसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. या मोहिमेचा परिणाम म्हणून एप्रिल आणि मे मध्ये सुमारे ८,५०० अनधिकृत प्रवाशांना दंड आकारण्यात आला आहे, ज्याद्वारे तब्बल २९ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT