किन्हवली : नवसाने पूत्रप्राप्ती झालेल्या महिला आपल्या बाळाला वजन काट्यात त्याच्या वजना इतक्‍या फळांनी जोखतात. 
मुंबई

ठाणे जिल्ह्यात 'येथे' भरतो 400 वर्ष जुना यात्रोत्सव

शामकांत पतंगराव

किन्हवली : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यात शेणवे परिसरातील सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या ठुणे गावात पौष महिन्याच्या पुत्रदा एकादशीनिमित्त यात्रोत्सवाला आजपासून (सोमवार, ता. 6) उत्साहाने सुरुवात होणार आहे. शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते सकाळी सहा वाजता विठ्ठल रखुमाईची महापूजा झाल्यानंतर तीन दिवसांच्या यात्रोत्सवाला सुरुवात होईल. या यात्रेचे यंदाचे हे 409 वे वर्ष आहे. 

सुमारे चारशे वर्षांपूर्वी पांडुरंगाचे निस्सीम भक्त संत गोरा कुंभार यांचे पुर्वज ठुणे गावात व्यवसायानिमित्त स्थलांतरीत झाले होते. गावकुसाबाहेर एका शेतात उतरलेले कुंभार कुटुंब मातीची भांडी बनवून ती परिसरात विकत असत. विठ्ठलाच्या निस्सीम भक्तीपोटीच त्यांनी तिथे पुत्रदा एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल-रखुमाई मूर्तीची स्थापना केली.

तेव्हापासून ठुणेची यात्रा आजतागायत अखंडित सुरू आहे. "पूत्रप्राप्तीसाठी पावणारा विठोबा', अशी ख्याती असल्याने ठाणे, मुंबई, नगर, नाशिक, पुणे अशा ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या जिल्ह्यांतून शेकडो भाविक या ठिकाणी येऊन नवस बोलतात. 

भजन, कीर्तन, भारूडाबरोबरच मनोरंजनासाठी येथे आकाश पाळणे, तमाशाचे फडही रंगतात. स्थानिक हौशी मंडळांकडून क्रिकेटचे सामनेही आयोजित करण्यात येतात. पूर्वी 15 दिवस चालणारी यात्रा काळाच्या ओघात तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. यात्रेत भांडी, मिठाई, बांगड्या, घोंगड्या, चादरी, ब्लॅंकेट, टाळ-मृदूंग, मुलांची खेळणी, शेतीची अवजारे यांची वारेमाप खरेदी-विक्री होते. अनेक धार्मिकविधी, भजन-कीर्तनाचा अखंड नामघोष अशा वातावरणात शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होऊन यात्रोत्सवाची सांगता होते. 

मुस्लीम कुटुंबीयांकडून पोषाख

ठुणे यात्रेचे यंदाचे हे 409 वे वर्ष असून अलीकडच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे. ठुणे येथील मुस्लीम कुटुंबातील अहमदभाई यास विठ्ठलाने दिलेल्या दृष्टांतानुसार यात्रेच्या दिवशी विठ्ठल रखुमाईचा पोषाक या मुस्लीम कुटुंबाकडून दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT