Health workers  sakal
मुंबई

मुंबई : 4000 आरोग्य सेविकांचे कामबंद

एकदिवसीय संपानंतर मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संप करणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महापालिकेत आरोग्य सेविकांनी (Health workers) कोविड (Covid-19)काळात मोलाची भुमिका बजावली असली तरी आज त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने सोमवारी तब्बल 4000 आरोग्य सेविका संपावर(Strike) जाणार आहेत.

कोविड महामारीच्या काळात आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता दोन वर्ष मुंंबईकरांच्या आरोग्याच्या अडचणी सोडविणे तसेच घरोघरी जाऊन माहिती देण्याचे काम या आरोग्य सेविकांनी केले. मात्र केंद्र आणि राज्य सरकार केलेले कायदे महापालिका पायदळी तुडवत असून मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने सरकारला इशारा देण्यासाठी हा एक दिवसीय संप केला जाणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड प्रकाश देवदास यांनी दिली.

न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाने 2015 पासून किमान वेतन, प्रोविडंट फंड देण्यात यावा, 65 वर्षानंतर निवृत्त झालेल्या आरोग्य सेविकांना पाच हजार रुपये पेंशन व उपदान त्वरीत देण्यात यावे. सध्या सेवेत असलेल्या आरोग्य सेवी कर्मचार्यांना प्रसूती रजा व इतर रजा देण्यात याव्यात, 300 रुपये कोविड भत्ता देण्यात यावा, 5 लाखाची गट विमा योजना, 2016 ला भरती झालेल्या आरोग्य सेविकांना भाऊबीज भेटीची थकबाकी द्यावी तसेच न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 2000 साला पासूनचे 600 रुपये सर्व सी एच व्हींना देण्यात यावेत अशा विविध मागण्यांसाठी हा संप करण्यात येत आहे.एकदिवसीय संपातून या मागण्यांबाबत सरकारने विचार करावा इतकी माफक अपेक्षा आहे. तरी देखील मागण्या मान्य न झाल्यास पुढे बेमुदत संप करणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश देवदास यांनी दिला.(Mumbai news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT