Omicron sakal media
मुंबई

मुंबईत 48 तसात एक प्रवासी ओमिक्रॉन बाधित

15 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली असून ...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गेल्या दीड महिन्यात परदेशातून आलेल्या 49 प्रवासी कोविड बाधित (Covid disrupted) आढळले आहेत. त्यातील 15 जणांना ओमायक्रॉनची(Omicron)बाधा झाली असून 48 तासात सरासरी 1 प्रवासी ओमायक्रॉन(Omicron) बाधित असल्याचे सापडत आहे.

सर्वेक्षणामध्ये आतापर्यंत 49 आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांना कोविड ची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यात 32 पुरुष आणि 17 महिलांचा समावेश आहे. त्यांच्या संपर्कात 15 अतिजोखमीचे सहवासित आले असून त्यात 5 पुरुष तर 10 स्त्रियांचा समावेश असून महिलांचे प्रमाण अधिक आहे.

परदेशातून आलेल्या 49 प्रवाशांना आतापर्यंत कोविड विषाणूची बाधा झाली असून त्यातील 15 जणांना ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे. त्यात 11 पुरुष तर 4 महिलांचा समावेश आहे. कोविडची बाधा झालेल्या एकूण परदेशी प्रवाश्यांची तुलनेत हे प्रमाण 30 % इतके आहे. प्रत्येक 48 तासात एक प्रवासी ओमायक्रॉन बाधित आढळत आहे.

शुक्रवारी अति जोखमीच्या देशातून मुंबईत 305 आंतरराष्ट्रीय प्रवासी दाखल झाले. 1 नोव्हेंबर पासून मुंबईत 8626 आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबईत उतरले आहेत. त्यातील त्यातील 15 प्रवाश्यांना ओमायक्रॉनची बाधा झाली असून त्यातील 5 प्रवासी मुंबईच्या बाहेरील राहणारे आहेत.

13 जण ओमायक्रॉनमुक्त

बहुतांश ओमायक्रॉन बाधितांना कोणतीही लक्षणे नाहीत. खबरदारीची उपाययोजना म्हणून कोविड बाधित रुग्णांना देखील रुग्णालयात दाखल केले जात असून त्यांचे नमुने जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात येत आहेत. रुग्णालयात दाखल एकही रुग्ण सध्या गंभीर स्थितीत नाही. तर आतापर्यंत 13 ओमायक्रॉन बाधित बरे झाले असून त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Impact: पेट्रोल-डिझेल महागलं… आता होम लोन आणि EMI वरही बसणार मोठा फटका!

IAS पद्मा जयस्वाल कोण? २३ वर्षे सेवेनंतर बडतर्फ, राष्ट्रपतींनी कारवाईला दिली मंजुरी

MI च्या इतिहासातील एक पर्व संपलं! १६ वर्षांपासून संघासोबत असलेल्या दिग्गजाने, MI ला ठोकला रामराम

Gold Rate Today: सोन्या-चांदीत मोठी घसरण! सोनं 11 हजार तर चांदी 30 हजारांनी स्वस्त; काय आहे ताजा भाव?

२-३ वर्षे तयारी, लाखो रुपये खर्च; पेपरफुटीने NEET परीक्षा रद्द, ३ विद्यार्थ्यांनी संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT