मुंबई

P305 जहाज बुडाल्याची पोलीस चौकशी, ४९ मृतदेह सापडले

दीनानाथ परब

मुंबई: तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून अरबी समुद्रात बुडालेल्या जहाजावरील २६ कर्मचाऱ्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. सलग चौथ्या दिवशी नौदलाकडून शोध मोहीम सुरु आहे. काल रात्रभर नौदलाकडून जहाजावरील सर्च लाईटच्या माध्यमातून शोध मोहिम सुरु होती. आज सकाळी नौदलाने हवाई शोध मोहिम सुरु केलीय. त्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जातोय.

P305 हे जहाज सोमवारी अरबी समुद्रात बुडाले. आतापर्यंत ४९ मृतदेह हाती लागले असून २६ जणांचा शोध सुरु आहे. अत्यंत प्रतिकुल वातावरणाचा सामना करत नौदलाने P305 जहाजावरील १८६ जणांची सुटका केली. तौक्ते चक्रीवादळाचा इशारा दिलेला असतानाही, P305 जहाज खवळलेल्या समुद्रात का गेले? त्याची चौकशी करणार असल्याचे मुंबई पोलिसांनी जाहीर केले आहे. जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची अपघाती मृत्यू म्हणून पोलिसांनी नोंद केली आहे.

५ ते ७ मीटर उंचीच्या लाटा, ०.५ दृश्यमानता

भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळच्या समुद्रात नौदलाची एक मोठी बचाव मोहिम सुरु आहे. 'स्वत:चा जीव वाचवतानाच आम्हाला इतरांचे जीव वाचवायचे आहेत' हे भारतीय नौदल अधिकाऱ्याचे (Indian Navy) शब्दच सर्वकाही सांगून जातात. समुद्रात किती धोकादायक स्थिती असेल, ते चित्र स्पष्ट होते. तौक्ते चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae) तडाख्यात सापडलेल्या, अरबी समुद्रातील (arbain sea) जहाजं आणि तेल विहीरीवरील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी बचाव मोहिम सुरु आहे. (Indian Navy In Eye Of Cyclone Tauktae)

भारताचे नौसैनिक आपले जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवत आहेत. अजूनही ही बचाव मोहिम संपलेली नाही. P-305 जहाज बुडालं असून या जहाजावरील १८५ लोकांची सुटका केली. सोमवारी संध्याकाळी तौक्ते वादळामुळे खवळलेल्या समुद्रात P-305 आणि गाल कनस्ट्रक्टर ही जहाजं बुडाली. या दोन जहाजांवर मिळून ४१० कर्मचारी होते. P-305 जहाजात पाणी शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर, भारतीय नौदलाच्या युद्धनौका तडक खवळलेल्या समुद्रात बचाव मोहिमेसाठी निघाल्या. 'आम्ही कशाचीही पर्वा केली नाही, आमची जहाजं तडक निघाली' असे कमांडर एमके झा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT