महाराष्ट्र अनलॉकबाबत आदित्य ठाकरेंचं सूचक विधान

काय म्हणाले आदित्य ठाकरे?
महाराष्ट्र अनलॉकबाबत आदित्य ठाकरेंचं सूचक विधान

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (corona second wave) जबर फटका सहन करणाऱ्या मुंबईने आता तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी सुरु केली आहे. पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत तिसऱ्या लाटेच्या तयारीची माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाच्या डाटानुसार, महाराष्ट्रात आतापर्यत ५४ लाख नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून ८२ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. (Maharashtra minister aditya thackeray on unlock state)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तज्ज्ञांशी चर्चा सुरु आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान ही तिसरी लाट येऊ शकते. "तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आम्ही तीन मोठ्या गोष्टींची तयारी करत आहोत", असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पुरेसे बेड्स, ऑक्सिजन पुरवठा आणि आयसीयू उभारणीची तयारी सुरु आहे. त्यानंतर एकापेक्षा जास्त मास्क घालण्यासाठी सामाजिक मार्गदर्शकत्तत्व आखण्याचा विचार सुरु आहे. तिसरी गोष्ट म्हणजे कॉर्पोरेट्सचा प्रतिसाद. उद्योगधंदे सुरु राहिले पाहिजेत, अशा पद्धतीने आम्ही तिसऱ्या लाटेची तयारी करतोय असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र अनलॉकबाबत आदित्य ठाकरेंचं सूचक विधान
रशियाचं व्हॅक्सिन टुरिझम: लसीच्या डोससह मिळणार 'या' सुविधा

राज्यासाठी जास्तीत जास्त लस खरेदीची आम्ही तयारी करतोय, असे आदित्य ठाकरे म्हणाले. "जी तिसरी लाट सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येणार आहे, ती रोखायची असेल तर जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण आवश्यक आहे", असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र अनलॉकबाबत आदित्य ठाकरेंचं सूचक विधान
दिलासादायक! मुंबईतील रूग्णांचा आकडा हजाराच्या खाली

राज्याने ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला असून अनेक अनावश्यक गोष्टींवर निर्बंध कायम आहेत. अनलॉक बाबत आदित्य ठाकरे यांनी सूचक विधान केले. महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचे काय प्रमाण राहते? त्यावर अनलॉकची सर्व प्रक्रिया अवलंबून असेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com