50 crimes wanted accused arreted mumbai police  esakal
मुंबई

Mumbai Crime : 50 हून अधिक गुन्ह्यात पाहिजे आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

आरोपी अली हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला गुन्हेगार असून त्याच्यावर 56 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अंधेरीत राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला 2 लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने लुटल्याप्रकरणी एका 28 वर्षीय व्यक्तीला सोमवारी अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी फैजल अली उर्फ अलीमामा युसूफ अली शेख हा घाटकोपरचा रहिवासी आहे .

आरोपी अली हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला गुन्हेगार असून त्याच्यावर 56 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी विरोधात न्यायालयाकडून पाच प्रोडक्शन वॉरंट आणि चार अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी 3 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8.10 च्या सुमारास आरोपी शेख आणि त्याच्या साथीदारांनी अंधेरी येथे एका 60 वर्षीय महिलेला लुटले.अंधेरी परिसरात एक महिला मंदिरात जात असताना शेख याने त्याच्या साथीदारासह तिचे 11 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आणि 13 ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपीच्या साथीदाराला अटक करण्यात आली, मात्र पोलिसांना आरोपी शेखचा माग काढता आला नाही. त्यानंतर शेखचा निवासी पत्ता शोधण्यात पोलिसांना यश आले.

अनेक दिवस पाळत ठेवल्यानंतर सोमवारी तो त्याच्या घरी आला असता पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर शेखचा घरचा पत्ता शोधण्यात पोलिसांना यश आले. अनेक दिवस पाळत ठेवल्यानंतर सोमवारी तो त्याच्या घरी आला असता पोलिसांनी त्याला अटक केली.

तपासा दरम्यान पोलिसाना त्याच्यावर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात 56 हून अधिक खटले दाखल असल्याची माहिती मिळाली. एमआयडीसी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT