covid vaccine covid vaccine
मुंबई

Covid -19: मुदत संपणाऱ्या ५० हजार लसी जाणार वाया

राज्यभरात लसीकरणासाठी शासनाने विविध पातळ्यांवर लोकांना आवाहन केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशासह राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्या कमी होत आहे. मात्र असं असंल तरी अजूनही कोरोनाचं सावट हटलेलं नाही त्यामुळे प्रशासनानं काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, राज्यभरात लसीकरणासाठी शासनाने विविध पातळ्यांवर लोकांना आवाहन केलं आहे. परंतु सध्या मुंबईतून एक वेगळी बातमी समोर आली आहे.

मुंबईतील तीन खासगी रुग्णालयांतील कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या साठ्याची मुदत लवकर संपणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुदत संपणार असल्यानं या लसी बदलून द्याव्यात, यासाठी खासगी रुग्णालय प्रशासनाने राज्याच्या आरोग्य विभाग आणि मुंबई पालिकेला लेखी निवेदन दिले आहे. मुदत संपत येणाऱ्या ५० हजारांहून अधिक लशी घेऊन त्या बदल्यात खासगी रुग्णालयांना नवा साठा उपलब्ध देण्यात यावा, असे यात नमूद करण्यात आले आहे.

मुंबईच्या अंधेरीतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात १५ ते १६ हजार लस मात्रा आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्यांची मुदत संपणार आहे. याशिवाय मुलुंड व बोरिवली येथील ॲपेक्स रुग्णालय समूहाकडे १० हजार लस मात्रा असून त्यांची मुदत ५ मार्चला संपणार आहे. खासगी रुग्णालयांचे समन्वयक यांनी ही माहिती सांगितली आहे. यावेळी ते म्हणाले, शहर उपनगरातील खासगी रुग्णालयांकडील बराचसा लससाठा हा एक - दोन महिन्यांत कालबाह्य होणार आहे.

शहर उपनगरांतील खासगी रुग्णालयांमधील जवळपास दोन लाख लस मात्रांचा साठा जून २०२२ मध्ये कालबाह्य होणार आहे.लतांत्रिक कारणांमुळे खासगी रुग्णालयांना पालिका लससाठा बदलून देऊ शकत नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT