मुंबई

Independence Day Special: पाकिस्तानातून त्रस्त होऊन आलेल्या 54 सिंधी बांधवांना मिळाले भारतीय नागरिकत्व!

Latest Ulhasnagar News : देशाचे नागरिकत्व मिळालेल्यांनी पाकिस्तानात असताना त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या व्यथा उपस्थितांसमोर मांडल्या.

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

दिनेश गोगी

Latest Marathi News: अखंड भारताच्या विभाजनानंतरही पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूं सिंधी नागरिकांची विविध प्रकारे प्रताडणा अद्यापही सुरूच आहे.याच त्रासाला त्रस्त होऊन भारतात आलेल्या 54 सिंधी भाषिकांना उल्हासनगरात आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात भारतीय नागरिकत्वाची गिफ्ट देण्यात आली आहे.

राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद,महाराष्ट्र सिंधी साहित्य अकॅडमी,सिंधी कलाकार संगम आणि उल्हासनगर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने सिंधी भवन येथे विभाजन विभाषिका स्मृती दिवसाचे आयोजन बुधवारी स्वातंत्र्य दिनी करण्यात आले होते.

तेंव्हा पाकिस्तानातून त्रस्त होऊन 11 ते 15 वर्षांपूर्वी भारतात आलेल्या आणि विविध शहरात राहणाऱ्या 54 सिंधी नागरिकांना नागरिकत्व सुधारणा कायद्यान्वये भारतीय नागरिक्तवाचे सर्टिफिकेट देण्यात आले.यावेळी आयुक्त डॉ.अजीज शेख,महाराष्ट्र सिंधी साहित्य अकॅडमीचे अध्यक्ष महेश सुखरामानी,अतिरीक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,किशोर गवस,उपायुक्त डॉ.सुभाष जाधव,मुख्य लेखापरीक्षक शरद देशमुख,सहायक आयुक्त मनिष हिवरे,विधी अधिकारी राजा बुलानी,यांच्यासह लाल पंजाबी,राजेश वधारिया,राजू जग्यासी,विनोद तलरेजा आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी प्राध्यापिका प्रिया वाच्छानी आणि सीमा मेंघानी यांच्या प्रयत्नातून सिंधी संस्कृतीच्या प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमादरम्यान देशाचे नागरिकत्व मिळालेल्यांनी पाकिस्तानात असताना त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या व्यथा उपस्थितांसमोर मांडल्या.

पाकिस्तानमध्ये त्यांना भेडसावणाऱ्या समस्या,त्यांचा व्यवसाय आणि धर्म सुरक्षित ठेवणे त्यांना किती कठीण होते आणि आता हिंदू म्हणून त्यांना देशात कसे सुरक्षित वाटत आहे याबद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या सिंधी भाषिकांना नागरिकत्वासाठी भारतीय सिंधू सभेने मदत केली आहे.त्यांनी मोदी सरकारचे आभार मानले.

नवीन सीएए(CAA)कायद्यामुळे गेल्या 11 ते 15 वर्षांपासून नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या 150 लोकांपैकी 54 जणांना केवळ तीन महिन्यांत भारतीय नागरिकत्व मिळाले आहे आणि उर्वरितांनाही लवकरच नागरिकत्व मिळण्याची शक्यता असल्याची माहिती महाराष्ट्र सिंधी साहित्य अकॅडमीचे अध्यक्ष महेश सुखरामानी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीड लैंगिक छळ प्रकरणात आरोपीचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवले; क्लासेसमधील सहकाऱ्यांचेही जबाब नोंदवले

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचा भीमपराक्रम! भारताचा 'सर्वोकृष्ट' कसोटी कर्णधार ठरला, विराट कोहलीचा मोडला विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलसमोर इंग्लंडने गुडघे टेकले! गावस्करांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, जगात भारी ६ पराक्रमही केले

Latest Maharashtra News Updates : बालेवाडीत कार्यालयातून १९ लाखांचे विदेशी चलन लंपास

SCROLL FOR NEXT