मुंबई : को-विन ऍपमध्ये दुरुस्ती केल्यानंतर पालिकेने शनिवारी मुंबईत लसीकरण मोहीम सुरू केली. आता उद्या (ता. 19) दोन दिवसांनंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे काम पुन्हा सुरू होईल; पण पालिकेने पहिल्या 50 हजार ते 55 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस देण्याचे ठरविले आहे. एवढेच डोस सध्या पालिकेकडे उपलब्ध आहेत.
मुंबईत सुमारे 1.25 लाख आरोग्य कर्मचारी आहेत. एका आरोग्य कर्मचाऱ्याला 28 दिवसांत दोन डोस दिले जातील; मात्र पालिकेला कोव्हिशिल्डचे 1,39,500 डोस मिळाले आहेत. अशा परिस्थितीत आताच्या यादीनुसार पालिकेने प्रथम 50 ते 55 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, आपल्याकडे उपलब्ध डोसनुसार सुरुवातीला केवळ 50 ते 55 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन डोस देऊ शकतो. लस घ्यायला आलेल्या पहिल्या 50 हजार लोकांना 28 मध्ये दुसरा डोस देणे खूप महत्त्वाचे असेल. म्हणूनच केंद्राकडून लस अधिक प्रमाणात आल्याशिवाय आम्ही लसीकरणाची संख्या वाढवू शकत नाही.
मुंबईत पहिल्या दिवशी 4100 आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी फक्त 1926 कर्मचाऱ्यांनी लशीचा डोस घेतला. अशा परिस्थितीत यादीमध्ये नाव आल्यानंतरही लस घ्यायला न येणारे लाभार्थी आता सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केल्यानंतर अंतिम फेरीत बोलावले जाईल. म्हणजे जरी आता नंबर चुकला तरी सर्वांत शेवटी लस घेता येईल.
एका दिवसात 4100 उद्दिष्ट
मुंबईत पालिकेने एका दिवसात 4000 लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून, जेजे रुग्णालयाने 100 चे उद्दिष्ट ठेवले आहे. म्हणजे एका दिवसात 4100 लोकांना लस दिली जाईल. पालिकेची नऊ आणि जेजे रुग्णालय अशा एकूण 10 केंद्रांवर लशी देण्यात येणार आहेत. वरील 10 केंद्रांवर एकूण 41 बूथ असतील.
55 thousand employees Only enough vaccine dose is available in mumbai
---------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.