CIDCO PradhanMantri Awas Yojana esakal
मुंबई

Mumbai : खुशखबर! पावसाळ्यात 'सिडको'च्या घरांचा पाऊस; 65 हजारांपेक्षा जास्त सदनिकांच्या लॉटरीचा धूमधडाका

येत्या जून महिन्यानंतर वेगवेगळ्या गटांतील गृह प्रकल्पांची लॉटरी सिडकोतर्फे काढण्यात येणार आहे.

सुजित गायकवाड

लॉटरीसाठी सिडकोने नव्या सॉफ्टवेअरचे काम पूर्ण केले आहे.

नवी मुंबई : अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) आणि मध्यम उत्पन्न व उच्च उत्पन्न गटासाठी सिडको महामंडळाने (CIDCO Corporation) तयार केलेल्या घरांची लवकरच लॉटरी निघणार आहे.

येत्या जून महिन्यानंतर वेगवेगळ्या गटांतील गृह प्रकल्पांची लॉटरी सिडकोतर्फे काढण्यात येणार असून त्याअंतर्गत तब्बल ६५ हजार घरे उपलब्ध होतील, असा अंदाज आहे. लॉटरीसाठी सिडकोने नव्या सॉफ्टवेअरचे काम पूर्ण केले आहे. जून महिन्यातील लॉटरीकरिता त्याचा वापर करण्याचा विचार सिडको वर्तुळात केला जात आहे.

तळोजा, खारघरला प्राधान्य

पहिल्या टप्प्यात तळोजा परिसरात शिर्के कंपनीतर्फे तयार करण्यात आलेली सुमारे पाच हजार घरांची लॉटरी जूनमध्ये काढण्याचे सिडकोच्या विचाराधीन आहे. त्या पाठोपाठ खारकोपर, कळंबोली, खारघर, जुईनगर आणि सानपाड्यातील घरांची कामे पूर्णत्वास आल्यास त्याचीही लॉटरी निघेल.

भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोतर्फे वर्षभरात एक लाख घरे निर्माण करण्याची घोषणा केली होती. आता तिला मूर्त स्वरूप आले आहे. सिडकोतर्फे तळोजा, उलवे, खारकोपर, कळंबोली, सानपाडा, जुईनगर आदी परिसरात गृह प्रकल्प उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. विशेष म्हणजे, सिडकोने पहिल्यांदाच घरांच्या निर्मितीची कामे रियल इस्टेट जगतातील नावाजलेल्या एल अॅण्ड टी शापूरजी पालनजी इत्यादींसारख्या नामांकित कंपन्यांना दिली आहेत.

नुकतीच तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली आणि घणसोलीमध्ये सात हजार ४४९ घरांची लॉटरी काढण्यात आली होती. त्यापैकी भाग्यवान विजेत्यांना घरांच्या वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, त्यासोबतच सध्या सिडकोतर्फे तळोजा, कळंबोली, खारकोपर, उलवे, जुईनगर, सानपाडा आदी भागांत तब्बल ६५ हजारांपेक्षा जास्त घरांचे गृहप्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT