Tramadol-Tablet
Tramadol-Tablet 
मुंबई

बंदीनंतरही ‘ट्रामाडोल’च्या सात कोटी गोळ्या जप्त

अनिश पाटील

मुंबई - इसिस या दहशतवादी संघटनेचे ‘फायटर ड्रग्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘ट्रामाडोल’ या गोळीवर एप्रिलमध्ये बंदी घालण्यात आल्यानंतर देशभरातून सात कोटी गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. गंभीर बाब म्हणजे त्यापैकी सहा कोटींहून अधिक गोळ्या मुंबई परिसरातून हस्तगत झाल्या आहेत.

या गोळ्यांवर बंदी घालण्यात आल्यानंतर महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने २८ मे रोजी पालघर येथील एका कारखान्यावर, तसेच नवी मुंबईतील द्रोणागिरी परिसरातील एका गोदामावर छापे टाकून सहा कोटी १६ लाख ४१ हजार गोळ्या जप्त केल्या. या गोळ्या प्रथम आफ्रिका खंडातील देशांत, तेथून आखाती देशांत पाठविण्यात येणार होत्या. त्यानंतर ठाणे पोलिसांनी चौघांना अटक करीत सुमारे दोन लाख गोळ्या जप्त केल्या होत्या. सप्टेंबर महिन्यात दिल्ली विमानतळावर झालेल्या अन्य एका कारवाईत एक लाख ३० हजार गोळ्यांचा साठा हस्तगत करण्यात आला होता. याप्रकरणी इस्तंबुलच्या नागरिकाला अटक करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT