Money
Money 
मुंबई

‘धनगर महिला संस्थांना ७५ टक्के अनुदान’

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - बंदिस्त शेळी-मेंढी पालन प्रकल्पासाठी भटक्‍या जमाती ‘क’ प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील महिलांच्या सहकारी संस्थांना ७५ टक्के अनुदानाची योजना राबविण्यात येणार आहे, असे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी आज येथे सांगितले. महिला बंदिस्त शेळी-मेंढी पालन सहकारी संस्थांच्या प्रकल्पाबाबत जानकर यांच्या अध्यक्षतेखाली तारापोरवाला मत्स्यालय येथे बैठक झाली.  

जानकर म्हणाले, ‘‘व्यक्तिगत स्तरावर योजनेचा लाभ घेण्याची आर्थिक क्षमता नसलेल्या धनगर व तत्सम समाजातील महिलांसाठी या योजनेची रचना करण्यात येत आहे. महिलांच्या नोंदणीकृत सहकारी संस्थांना ७५ टक्के अनुदानावर शेळ्यांचे गट देण्याची योजना आहे. योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळावा आणि लाभार्थ्यांची संख्या वाढावा, यासाठी प्रचार, प्रसार कार्यावर विशेष लक्ष द्यावे. पशुसंवर्धन विभागाच्या शेळी-मेंढी गट वाटपाच्या नावीन्यपूर्ण योजनेतील पशुधन खरेदीचे दरांमध्ये सुधारणा करावी.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT