मुंबई

तब्बल 80 एकर जमील लाटली; नवी मुंबईतील या बिल्डरला झाली अटक

सकाळ वृत्तसेवा


नवी मुंबई : लातूर येथील बनावट शेतकरी दाखल्याच्या आधारे नवी मुंबईतील गव्हाण येथील सर महम्मद युसूफ ट्रस्टची 80 एकर जमीन बळकावल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी न्हावा-शेवा पोलिसांनी बुधवारी नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक भूमीराज ग्रुपचे संचालक भूपेंद्र शहा यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी कर्जत येथील तलाठी रमेश भालेराव व त्याचा साथीदार सतीश शिर्के या दोघांना अटक केली आहे. 
 नवी मुंबईतील भूमीराज ग्रुपचे संचालक भूपेंद्र शहा यांनी बनावट शेतकरी दाखल्याच्या आधारे शेकडो कोटींची ही जमीन हडप करून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार मे. रिगल हेबीटेट प्रा. लि. या कंपनीचे प्रतिनिधी पाम भणगे यांनी न्हावा पोलिस ठाण्यात केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी भूपेंद्र शहा, किरण दांड व महम्मद युसूफ ट्रस्टचा अध्यक्ष हारुन अलीम ए. आर. युसूफ, सुरेश शेडगे, बाज खान, रमेश भालेराव व इतर यांच्याविरुद्ध बनावट शासकीय कागदपत्रे बनवून जमीन लाटल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

ही बातमी वाचा ः काॅंग्रसचे भाजप हटाओ आरक्षण बचाओ आंदोलन
यापूर्वी पोलिसांनी कर्जत तालुक्‍यातील तलाठी रमेश भालेराव आणि सतीश शिर्के याला कर्जत परिसरातून अटक केली होती. या दोघांच्या चौकशीनंतर या प्रकरणात भूमीराज ग्रुपचे संचालक भूपेंद्र शहा याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी दुपारी आरोपी भूपेंद्र शहा याला न्हावा-शेवा पोलिस ठाण्यात जबाब देण्यासाठी बोलावून घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. सायंकाळी शहा याला पनवेल येथील न्यायालयात हजर करण्यात आले असताना न्यायालयाने त्याला 15 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. 

जमीन सिडकोच्या माथी मारून मलिदा लाटण्याचा प्रयत्न 
महम्मद युसूफ ट्रस्टची 80 एकर जमीन संपूर्ण दलदलीची व खारफुटीयुक्त असल्यामुळेच आपण ही जमीन चार लाख रुपयांत विकत असल्याचे ट्रस्टच्या ठरावात अध्यक्ष हारुन अलिम याने म्हटले आहे. त्यामुळे ही खारफुटीयुक्त जमीन आता सिडकोच्या घशात घालून सिडकोकडून साडेबावीस टक्के योजनेंतर्गत सुमारे 50 हजार चौ. मी. क्षेत्रफळाचा भूखंड प्राप्त करण्याचा डाव संबंधित बिल्डरने महसूल व सिडकोच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आखला असल्याचा आरोप तक्रारदार विक्रम भणगे यांनी केला आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : आम्ही काही 'व्होट बँक' नाही आणि आम्हाला आमचे हक्क मिळालेच पाहिजेत: असदुद्दीन ओवेसी

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT