मुंबई

'उंची'अभावी हार्बरचे प्रवासी 'एसी'पासून वंचित 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील ब्रिटिशकालीन पुलांची कमी असलेली उंची, तर दुसरीकडे वातानुकुलित लोकलची उंची अधिक असल्याने या मार्गावर ही लोकल धावणे अशक्‍य आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे गारेगार प्रवासाचे स्वप्न अधुरेच राहणार आहे. 

मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी तिसरी वातानुकूलित लोकल 17 ऑगस्टला पश्‍चिम रेल्वेच्या विरारच्या कारशेडमध्ये दाखल झाली; मात्र या लोकलची उंची जास्त असल्यामुळे ती हार्बर मार्गावर धावणे शक्‍य नाही. कारण या मार्गावरील ब्रिटिशकालीन पुलांची उंची कमी आहे. त्यामुळे या पुलांखालून वातानुकूलित लोकल जाऊ शकणार नाही. हार्बर मार्गावर वडाळा ते सॅण्डहर्स्ट रोड अणि चेंबूर स्थानकाजवळ ब्रिटिशांनी बांधलेले 100 वर्षांहून जुने पुल आहेत. या पुलांची उंची कमी असून रुळ आणि ओव्हरहेड वायरमधील अंतर कमी आहे.

सर्वसाधारण लोकलची 4.270 मीटर असते. लोकलच्या सुरळीत वाहतुकीसाठी ती स्थानकात फलाटांवर उभी असताना लोकलचे छत आणि ओव्हरहेड वायरमधील अंतर 2.50 मीटर असणे आवश्‍यक असते. हेच अंतर लोकल धावत असताना 2.70 मीटर असणे गरजेचे असते; मात्र तिसऱ्या वातानुकूलित लोकलची उंची 4.270 मीटरपेक्षा सुमारे 15 मिमीने अधिक आहे. त्यामुळे ही लोकल हार्बर मार्गावर धावणे अशक्‍य आहे. 


मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या नशीबी प्रतीक्षाच 
पश्‍चिम रेल्वेवर चालवण्यात आलेल्या पहिल्या वातानुकूलित लोकलची उंची 4.275 मीटर होती. त्यामुळे मध्य रेल्वेने आपल्या मार्गावर ती लोकल चालवण्यास नकार दिला होता. मे महिन्यात दाखल झालेल्या दुसऱ्या वातानुकूलित लोकलची उंचीही 4.285 मीटर आहे. परिणामी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना वातानुकूलित लोकलच्या प्रवासासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

मला वाईट वाटतं, मी का बोलले नाही.. प्रथा म्हणून डोहाळे जेवणात घडलेली ती गोष्ट; मृणाल कुलकर्णी आजही विसरलेल्या नाही

SCROLL FOR NEXT