मुंबई

खंडाळा घाटात पुन्हा अपघात

सकाळ वृत्तसेवा


खोपोली : खंडाळा घाटातील अपघातांची मालिका सुरूच असून मंगळवारी रात्रीही घाटातील शिंग्रोबा मंदिर चढणीवर माल वाहतूक ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याखाली जाऊन उलटा झाला. यात ट्रकचालकाने खाली उडी मारल्याने तो किरकोळ जखमी झाला.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच घाट रस्ता वाहतूक पोलिस, महामार्ग आपत्कालीन मदत यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचून त्यांनी किरकोळ जखमी चालक हनुमंत खैरनार यांना मदत केली. त्याच्यावर प्रथमिक उपचारही करण्यात आले. सदर ट्रक मुंबईकडून पुण्याकडे औद्योगिक माल घेऊन जात होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT