Accused absconding 15 years arrested gold tooth mumbai crime
Accused absconding 15 years arrested gold tooth mumbai crime  esakal
मुंबई

Mumbai Crime News : सोन्याच्या दातामुळे 15 वर्ष फरार आरोपी अटकेत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सोन्याच्या दोन दातांवरून आरोपीला 15 वर्षांनंतर जेरबंद करण्यात मुंबईच्या आर. ए. के. मार्ग पोलिसांना यश आले आहे. 38 वर्षीय आरोपी प्रवीण जडेजा याला पॉलिसीची रक्कम घेण्याचा बहाणा करून मुंबईत बोलावण्यात आले होते. गुजरातहून मुंबईत येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, त्याच्या दोन सोन्याच्या दातांमुळे आरोपीला ओळखण्यात पोलिसाना मदत झाली.

मुंबईतील कपडा व्यवसायिकाकडे आरोपी प्रवीण जडेजा सेल्समन म्हणून काम करत होता. अन्य दुकानदारांकडे थकित असलेले 40 हजार रुपये आणण्यासाठी व्यावसायिकाने त्याला पाठवले. सदर रक्कम वसूल करून येत असताना चोरांनी लुटल्याचा बनाव प्रवीणने केला. या प्रकरणी तत्कालीन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी प्रवीणची उलट तपासणी केली असता त्याने चोरीचा बनाव केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात त्याला अटक झाली. दरम्यानच्या काळात प्रवीण याला जामीन मिळाला. मात्र तो न्यायालयीन तारखांना गैरहजर राहू लागला. अखेर मुंबईतील न्यायालयाने त्याला फरार घोषित केले.

फरार आरोपी प्रवीणचा शोध सुरू असताना तो गुजरातमध्ये असल्याचे समजले. त्याच्या अटकेसाठी तपास पथकाने जाळे पसरवले. पॉलिसी मॅच्युरिटी झाल्याचे सांगून पैसे घेण्यासाठी मुंबईत बोलावले. पैशांच्या लालसेपोटी प्रवीण मुंबईत येताच पोलिसांनीत्याच्या मुसक्या आवळल्या.पोलिसाना आरोपीची ओळख पटवण्यात त्याचे 2 सोन्याचे दात महत्त्वपूर्ण ठरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT