Accused in various crimes arrested by Sakinaka police mumbai esakal
मुंबई

Crime News : विविध गुन्ह्यांमध्ये फरार पाहिजे आरोपी साकीनाका पोलिसांकडून अटकेत...

17 जानेवारी रोजी साकीनाका पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शस्त्रास्त्रे बाळगणे, लुटमार चोरी अशा विविध गुन्ह्यांमध्ये फरार पाहिजे आरोपीला साकीनाका पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत. अटक आरोपीचे नाव गौरंग आनंद चौधरी उर्फ सॅण्डी असून तो दिवा ठाणे येथील रहिवासी आहे.

17 जानेवारी रोजी साकीनाका पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस पथकाने साकीनाका व पवई परिसरातील सिसिटीव्ही कॅमेरे तपासुन आरोपीची ओळख निश्चीत केली .

सदर आरोपीचा पोलिसांनी माग काढून, आरोपीस 18 जानेवारीला दिवा ठाणे येथून ताब्यात घेण्यात आले होते. आरोपींला न्यायालयाने पोलीस कोठडी मंजुरी केली. पोलिसांनी अधिक तपास करुन 19 जानेवारी रोजी 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सदर जात दुचाकी हया आरोपीने साकीनाका, मुंलुंड, भांडुप, कळवा ठाणे परिसरातुन चोरी केल्या आहेत. तपासात चार गुन्ह्याची उकल करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे.

आरोपी विरोधात शस्त्रास्त्रे बाळगणे , जबरीने लुटणे, मारामारी करणे, वाहन चोरी करणे अशा प्रकारच्या विविध गुन्हयाची नोंद असुन तो ठाणे तुरुंगातून जुलै 2022 मध्ये जामिनावर मुक्त झाला.तेव्हापासून आरोपी फरार झाला होता. जामिनावर तुरुंगाबाहेर असताना सुध्दा आरोपी गुन्हेगारी कारवाया करण्यात सहभागी होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT