मुंबई

भिवंडीत किरकोळ वादातून अँसिड हल्ला; पाच जण जखमी; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

शरद भसाळे

भिवंडी - भिवंडी शहरातील साईनगर ताडाळी अंजुरफाटा रोड येथे गुरुवारी झालेल्या क्षुल्लक वादातून शुक्रवारी त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकांवर तीन ते चार जणांनी अँसिड फेकून हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.यामध्ये पाच जण भाजल्याने जखमी झाले असून त्यापैकी दोन जणां वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील ताडाळी साईनगर येथील निखिल शर्मा हा गुरुवारी सकाळी कामावरून घरी परतत असताना त्या परिसरातच राहणारे भंगार व्यावसायिक अब्दुल रहीम खान व सलीम पठाण यांच्यात भांडण झाले होते. .हे भांडण मिटविण्यासाठी त्याचे मित्र रोहित पांडे, सुरज पटेल, अभिषेक शर्मा, निलेश कुमार हरिजन, अभिषेक देशमुख यांनी सोडविले होते. सदर वेळी आरोपी अब्दुल खान याने अभिषेक देशमुख यास धमकी दिली होती. त्यामुळे काल रात्री 08.30 वा सुमारास अब्दुल खान याने  दिलेल्या धमकीचा जाब विचारण्या करता रोहित पांडे व त्याचे मित्र सुरज पटेल, अभिषेक शर्मा, निलेश कुमार हरिजन, अभिषेक देशमुख हे अब्दुल याच्या घरी गेले असता सदर गोष्टीचा सलीम पठाण व अब्दुल यांना राग आल्याने त्यांने घरातून बकेटमध्ये साठविलेले ॲसिड आणून रोहित पांडे व त्याचे चार मित्र यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर टाकून गंभीर जखमी केले. या बाबत रोहित पांडे यांनी नारपोली पोलीस ठाण्यात  तक्रारी देताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी अब्दुल खान हा अँसिड फेकल्या नंतर खाली पडला असता तो सुध्दा तो सुध्दा जखमी झाला आहे. त्यास खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर सलीम पठाण याला अटक करण्यात आलेली आहे.

जखमी अभिषेक देशमुख यास मुंबई सायन हॉस्पिटल येथे व अभिषेक शर्मा हा गुरुकृपा हॉस्पिटल भिवंडी येथे उपचारा करीता दाखल आहे. उर्वरित तीन जखमींना उपचार करून घरी सोडले आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे करीत आहेत.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT