mumbai rickshaw taxi
mumbai rickshaw taxi sakal
मुंबई

Rickshaw Taxi : मुंबईत आजपासून मीटर रिकॅलिब्रेशन नसलेल्या रिक्षा, टॅक्सीवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणातील रिक्षा, टॅक्सीच्या मीटर रिकॅलिब्रेशन करण्यासाठी १५ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

मुंबई - मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणातील रिक्षा, टॅक्सीच्या मीटर रिकॅलिब्रेशन करण्यासाठी १५ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्याप्रमाणे रविवारी मुदत संपणार असून, मीटर रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा, टॅक्सी चालकांवर कारवाई केली जाणार आहे. यामध्ये पर डे ५० रुपये तर जास्तीत जास्त ५ हजार रुपयांचा दंड करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे.

गेल्यावर्षी ऑटो रिक्षा व टॅक्सीच्या वाढीस मान्यता दिली आहे. यामध्ये ऑटो रिक्षांसाठी प्रथम 1.5 किलोमीटरसाठी पूर्वीचा दर 21 रुपये होता. आता वाढीव दर 23 रुपये, असा ठरविण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वी 14.20 पैसे होता, तो आता 15.33 पैसे केला आहे.

टॅक्सीसाठी प्रथम 1.5 किमीसाठी पूर्वी 25 रुपये होते. तो आता 28 रुपये असा ठरविण्यात आला असून त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वी 16.93 पैसे होता, तो आता 18.66 पैसे व कूल कॅब (वातानुकूलित) साठी प्रथम 1.5 किमीसाठी पूर्वीचा दर 33 रुपये भाडेदर होता, तो आता 40 रुपये असा दर ठरविण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वीचा दर 22.26 पैसे होता, तो सुधारित 26.71 पैसे असा ठरविण्यात आला असून नवीन भाडेवाढ गेल्यावर्षी 1 ऑक्टोबर पासून अंमलात आली आहे.

त्यानुसार १५ जानेवारी पर्यंत रिक्षा , टॅक्सीचे मीटर रिकॅलिब्रेशन १०० टक्के होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही रिक्षा आणि टॅक्सी मिळून अद्याप ५० टक्के वाहन विना रिकॅलिब्रेशन रस्त्यांवर प्रवासी वाहतूक करत आहे.

परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य मुंबईत २६७३८ एकूण काळी पिवळी टॅक्सी आहे. त्यापैकी ६८.२९ टक्के टॅक्सी रिकॅलिब्रेशन झाले आहे. तर पच्छिम मुंबईत ६४१८ एकूण काळी पिवळी टॅक्सी ची संख्या असून, ५२.९८ टक्के वाहन रिकॅलिब्रेशन झाले तर मुंबई पूर्व आरटीओ अंतर्गत ८२६४ टॅक्सी असून त्यापैकी ५०.४१ टक्के रिकॅलिब्रेशन झाले आहे. तर पच्छिम मुंबईत ५६००८ रिक्षा असून ७३.३६ टक्के रिक्षा रिकॅलिब्रेशन झाले तर मुंबई पूर्व मध्ये ८२३६८ रिक्षा असून ५६.६८ टक्के रिक्षा रिकॅलिब्रेशन झाले असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT