मुंबई

अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांवर कारवाई 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या रेल्वे गाड्यांमधील डब्यांमधून बेकायदा प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. यामुळे अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या चुकार प्रवाशांना आता लगाम बसू शकतो. 

अपंगांसाठी आणि दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या प्रवाशांसाठी राखीव डबे आहेत. मात्र सर्वसाधारण प्रवासीही या डब्यांमधून प्रवास करतात. तसेच कधी कधी पोलिस कर्मचारीही प्रवास करतात. याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर मुख्य न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. मध्य रेल्वेच्या सुरक्षा पथकाच्यावतीने सुरक्षा आयुक्त सचिन भलोदे यांनी यासंबंधी केलेल्या कारवाईचा अहवाल दाखल केला. दिव्यांग आयुक्तांनी यासंबंधी निर्देश दिले होते. त्यानुसार सीएसटी ते कर्जत आणि हार्बर रेल्वे मार्गावर सतरा वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांचे पथक यासाठी तैनात असणार आहे. नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश रेल्वेच्या वतीने देण्यात आले आहेत. याशिवाय ही हेल्पलाईन यंत्रणा सुरू झाली असून ऑनलाईनवर तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्या शिवाय 3943 सीसी टीव्ही संच स्थानकांवर उपलब्ध करण्यात आले आहेत. अद्याप सीसी टीव्हीचे बसविण्याचे काम सुरू असून रेल्वेगाड्यांमध्येही सीसी टीव्ही लावण्यात येत आहेत. दिव्यांग प्रवाशांच्या डब्याला पिवळा रंग देण्याबाबत कार्यवाही सुरू झाली असली तरी त्याला तांत्रिक कारणामुळे विलंब लागण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच नियमाचे उल्लंघन करून प्रवास करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. प्रवाशांबाबत जनजागृती करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 

 सीसी टीव्ही सुरू 
- बेकायदा प्रवाशांवर कारवाईचे आदेश 
- आसन व अन्य सुविधा लवकरच उपलब्ध करणार 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT