Aditya Thackeray sakal media
मुंबई

मुंबई उपनगरचे पालकमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्‍टला भाजपसह 'या' पक्षाचा विरोध

समीर सुर्वे

मुंबई : वांद्रे किल्ला (bandra fort) ते माहिम किल्ल्यापर्यंतच्या (mahim fort) सायकल ट्रॅक या प्रकल्पाला (cycle track project) भाजपसह (bjp) समाजवादी पक्षानेही (samajwadi party) विरोध केला आहे. उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (aditya Thackeray) यांची ही संकल्पना आहे. या प्रकल्पासाठी नाहक खर्च केला जात असून खर्चही प्रत्यक्ष महामार्ग बांधण्यापेक्षा जास्त असल्याचा दावा करण्यात येत आहे.

माहिम किनाऱ्याचे सुशोभीकरण पुर्ण झाल्यानंतर वांद्रे किल्ला ते माहिम किल्ला असा 3.73 किलोमिटर लांबीचा सायकल ट्रॅक आणि वॉकवे बांधण्यात येणार आहे.त्यासाठी महानगर पालिकेने प्रशासकीय प्रक्रिया सुरु केली लवकरच निवीदाही जाहीर करण्यात येणार आहे.या कामाचा अंदाजित खर्च 167 कोटी रुपयांचा खर्च अंदाजित आहे.भाजप आणि समाजवादी पक्षाने या खर्चावर आक्षेप घेतला आहे.

पालिकेच्या अर्थसंकल्पात 1200 कोटी रुपयांची रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आणि 167 कोटी रुपयांची तरतूद शाळांच्या दुरुस्तीसाठी करण्यात आली आहे.मात्र,त्यासाठी अद्याप निधी मंजूर केलेला जात नसताना सायकल ट्रॅकसाठी निधी दिला जात आहे.महापालिकेने आता नागरीकांसाठी महत्वाच्या असलेल्या कामावर लक्ष देऊन निधी उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे समाजवादी पक्षाचे पालिकेतील गटनेते,आमदार रईस शेख यांनी नमुद केले.तसेच,हा प्रकल्प रद्द करण्यासाठी त्यांनी पालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनाही पत्र दिले आहे.

भाजपचे आमदार,माजी मंत्री ऍड.आशिष शेलार यांनीही या प्रकल्पाला विरोध आयुक्तांना पत्र दिले आहे.या कामाच्या प्रत्येक किलोमिटरसाठी तब्बल 44 कोटीहून अधिक खर्च करण्यात येणार आहे.हा खर्च राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाच्या खर्चापेक्षा 500 टक्‍क्‍यांनी अधिक आहे.तसेच,हा प्रकल्प आखताना स्थानिकांना विचारात घेण्यात आलेले नाही.त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यासाठी ऍड.शेलार यांनीही पालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation Election: एकनाथ शिंदेंच्या निवास्थानी मध्यरात्री मॅरेथॉन बैठक, काय ठरलं? महापालिका निवडणुकीसाठी आजचा दिवस निर्णायक!

Marathi Sahitya Sammelan: ग्रंथदिंडीने राजधानीत साहित्य, संस्कृतीचा जागर; साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिमाखात सुरू

अग्रलेख - भूमिकन्यांचा सन्मान

हिवाळ्याची खास चव! घरी बनवा गरमागरम गुळाची पोळी, रेसिपी इतकी सोपी की लगेच नोट कराल

आजचे राशिभविष्य - 02 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT