Mumbai Andheri company 
मुंबई

Mumbai: 'कामासाठी अमराठी व्यक्ती हवा आहे'; अंधेरीतील कंपनीच्या जाहिरातीमुळे वाद

No Marathi people for work in Andheri company: अंधेरीतील डायमंड कंपनीसाठी दिलेल्या जाहिरातीत नो महाराष्ट्रीयन असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- काही दिवसांपूर्वी गुजरातमधून काढलेल्या जाहिरातीत मुंबईमध्ये कामासाठी मराठी कर्मचारी नको म्हणून असा उल्लेख करण्यात आला होता. यावरून एकच वाद निर्माण झाला होता. आता असाच एक प्रकार समोर आला आहे. अंधेरीमधील एका कंपनीमध्ये कामासाठी 'मराठी कर्मचारी नको' अशा प्रकारची जाहिरात करण्यात आली आहे.

सदर प्रकारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीतील आर्या गोल्ड डायमंड कंपनीसाठी दिलेल्या जाहिरातीत नो महाराष्ट्रीयन असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील यावरून संताप व्यक्त केला आहे.

नो महाराष्ट्रीयन म्हणणाऱ्या या कंपनीत सुपर विजनसाठी जो माणूस हवा आहे. तो त्यांना मराठी नको आहे. या कंपनीची माहिती घेतली त्याच्यामध्ये असं कळलं की आधी सगळे कर्मचारी मराठी होते. कालांतराने त्यांना काढण्यात आला आणि त्या ठिकाणी बंगाली कामगार भरण्यात आले आणि आता त्यांच्यावर त्यांना जो माणूस हवाय तो त्यांना मराठी नको आहे, असं मनसेचे पदाधिकारी केतन नाईक म्हणाले आहेत.

मध्यंतरी गुजरात मधून काढण्यात आलेल्या एका जाहिरातीत मुंबईमध्ये त्यांना जी रिक्वायरमेंट हवी होती ज्यात त्यांना मराठी नको हवे होते... आता तोच प्रकार पुन्हा एकदा दिसून येतोय.... आम्ही यांची मुजोरी आजच उतरवणार, असं मनसेकडून सांगण्यात आलं आहे.

विजय वडेट्टीवार म्हणालेत की, 'मुंबईत असणारी आर्या गोल्ड कंपनी महाराष्ट्रातील सुविधा वापरते. पण, नोकरी बाहेरच्या लोकांना देत आहे. ही कंपनी महाराष्ट्रद्रोही आहे. या कंपनीच्या मालकाविरोधात एफआय़आर दाखल करण्यात यावा. लोकांना रोजगार मिळत नाहीये. यात फक्त पुरुष हवाय असा देखील उल्लेख आहे. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी करणार आहे. अशा लोकांना धाक राहिला नाही का?'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT