मुंबई

रडारद्वारा सर्व्हेक्षण केल्यांनतर CSMTच्या हेरिटेज इमारतीच्या घुमटाचे काम सुरु

कुलदीप घायवट

मुंबई, 22 : जागतिक वारसा असलेली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज इमारतीच्या घुमटातून पाणी गळतीची घटना घडली आहे. मात्र, यावर रेल्वे प्रशासनाकडून घुमटाचे काम सुरु आहे. सुरुवातीला ड्रोन सर्व्हेक्षण करण्यात आले होते. आता नुकताच रडार सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे घुमटातील अंतरंगात बाबींची माहिती मिळविण्यात आली आहे. 

सीएसएमटीची हेरिटेज इमारत मे १८८८ साली उभारण्यात आली. या वास्तूला १३२ वर्षे पूर्ण होणार आहेत. जगातील टॉप दहाच्या यादीतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची नोंद आहे. मात्र जागतिक वारसा असलेल्या इमारतीच्या मुख्य घुमटाच्या सांध्याला, इतर घुमटाला, विविध पुतळ्यांना तडे गेले आहेत.  

मागील वर्षीच्या पावसाळ्यात इमारतीच्या डोममध्ये, घुमटाच्या ठिकाणी गळती सुरू झाली होती. त्यामुळे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करून प्रत्येक भागाची पाहणी करण्यात आली. ड्रोनद्वारे घुमटाच्या बाहेरील भागाची पाहणी करण्यात आली. तर, रडारद्वारे अंतर्गत भागाची पाहणी करण्यात आली आहे. 

सीएसएमटीच्या घुमटाची जाडी 250 मिमी ते 450 मिमी आहे. या घुमुटची जाडी दोन ते तीन दगडांच्या थराची आहे. या थरांची रडारद्वारे सर्व्हेक्षण करण्यात आले. यातून प्रत्येक थराची जाडी, दगडांची अंतर्गत रचना याचा शोध घेण्यात आला आहे. पुढील वर्षीच्या पावसाळ्याआधी हेरिटेज इमारतीचे काम करण्याचे उद्दिष्टे आहे, असं वस्तू वारसातज्ज्ञ चेतन रायकर म्हणालेत.

लॉकडाऊन कालावधीचा योग्य वापर करून सीएसएमटी हेरिटेज इमारतीचे काम करण्यात आले आहे. नुकताच रडार सर्व्हेक्षणाद्वारे घुमटाचे सर्व्हेक्षण केले आहे. या कामामध्ये कुशल कामगार आणि वास्तू तज्ज्ञचा समावेश आहे. घुमटाच्या खालील ठिकाणी परांची उभारून काम सुरु आहे, असं शिवाजी सुतार(मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे) म्हणालेत. 

after radar inspection repair work of Dome starts in heritage building of CSMT

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT