मुंबई

कॉंग्रेसनेते पी.चिदंबरम यांना दणका? '63 मून्स' कंपनीची उच्च न्यायालयात याचिका

सुनिता महामुनकर


मुंबई :  काँग्रेेस नेते पी चिंदबरम यांच्यासह अन्य दोन जणांविरोधात 63 मून्स कंपनीने केलेल्या फौजदारी तक्रारीचा तपास सीबीआयने जलदगतीने करावा, अशी मागणी करणारी याचिका कंपनीतर्फे मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. शुक्रवारी याचिकेवर सुनावणी होणार आहे.

'63 मून'ने तिघांविरोधात दहा हजार कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावाही न्यायालयात दाखल केला आहे. सीबीआयने गेल्यावर्षी  ऑगस्टमध्ये तक्रारीबाबत पडताळणी करु, असे उच्च न्यायालयात सांगितले होते. त्यानंतर मार्च 2020 मध्ये  कंपनीने चौकशीबाबत सीबीआयला पत्र लिहिले. त्यावर मुख्य दक्षता अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी परवानगी मागितली आहे, असे कंपनीला सांगण्यात आले. त्यालाही चार महिने झाले असून अजूनही सीबीआयने माहिती दिलेली नाही, असे कंपनीने याचिकेत म्हटले आहे. 

नॅशनल स्पॉट एक्‍स्चेंज लिमिटेड कंपनीमधील (एनएसईएल) आर्थिक गैरव्यवहाराबाबत चिंदबरम यांच्यासह तिघेजण जबाबदार आहेत, असा आरोप कंपनीने केला आहे. सन 2012-13 मध्ये हा गैरव्यवहार उघड झाला होता. एनएसईएल 63 मूनची शिखर कंपनी  आहे. एनएसईएलच्या आर्थिक तोट्यामध्ये तिन्ही आरोपींनी हातभार लावला, असा आरोप कंपनीने केला आहे.  चिंदबरम यांच्यासह रमेश अभिषेक आणि के. पे. कृष्णन या तत्कालीन अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

-------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT