Ajit Pawar group insists guardian minister posts leaders met Fadnavis politics esakal
मुंबई

अजित पवार गट पालकमंत्रिपदांसाठी आग्रही; मंत्र्यांनी घेतली फडणवीसांची भेट, 3 मंत्रिपदांचेही स्मरण

अजित पवार गट मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आग्रही असून पुणे, रायगड, कोल्हापूर यासह प्रभावक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद बहाल करा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्ताधारी अजित पवार गट मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आग्रही असून पुणे, रायगड, कोल्हापूर यासह प्रभावक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद बहाल करा, या मागणीसाठी आज पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेले एक कॅबिनेट मंत्रिपद आणि दोन राज्यमंत्रिपदे रिक्त आहेत.

त्यासाठी शपथविधी व्हावा अशीही पक्षाची मागणी आहे. अद्याप भरल्या न गेलेल्या या कॅबिनेट मंत्रिपदावर बड्या नेत्याची वर्णी लागणार असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी चर्चा केली.

या वेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांना त्वरित दिले जावे, अशी मागणी करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांचाही पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर दावा आहे.

त्यामुळे हे पद कुणाला मिळणार, गणेशविसर्जनाला मानाच्या गणपतींची आरती कोण करणार, याबद्दल कमालीची उत्सुकता आहे अन् अप्रत्यक्ष कुरघोडीची तयारीही आडून सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा महायुतीत प्रवेश होण्यापूर्वीपासून पालकमंत्रीपदाबद्दल प्रतीक्षा सुरु आहे. फडणवीस पाच-सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत.

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना द्यावे की मंत्रिपदाच्या प्रतीक्षेतील भारत गोगावले यांच्यासाठी राखीव ठेवावे, याबद्दल वाद आहे. भाजपने त्यांच्या आमदारांना मंत्रिपदाचे स्वप्न न बघता कामाला लागा, असे सांगितले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातही अस्वस्थता आहे. या अडचणीतून मार्ग कसा काढायचा हा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोरचा प्रश्न आहे, असे बोलले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinagar Accident: ट्रॅव्हल्सचा उघडा दरवाजा आला काळ बनून! दर्शनावरून परतताना भीषण अपघात; दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू

Mundhwa Land Scam : जंगम मालमत्ता दाखविण्याचा प्रकार, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण; सह दुय्यम निबंधकांकडून अधिकाराचा गैरवापर

Latest Marathi News Update LIVE: गोरेगाव स्टेशन परिसरात अनधिकृत भाजीवाल्यांचा वाढता दादागिरीचा कहर

Mundhwa Land Scam : 'मुंढवा' प्रकरणातून बावधनपर्यंत धागेदोरे! सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्या सर्व व्यवहारांची तपासणी

Supreme Court: न्यायव्यवस्थेवर टीका करण्यास आक्षेप नाही, पण... सर्वोच्च न्यायालयाचा इशारा, दिली कौतुकास्पद शिक्षा

SCROLL FOR NEXT