crime news sakal media
मुंबई

रायगड : पोषण आहाराची चोरी; सहा जणांना ठोकल्या बेड्या

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : साठवणूक करून ठेवलेला पोषण आहार चोरून (Food Robbery) दुकानदाराला विकणाऱ्या सहा जणांना अलिबाग पोलिसांनी (Alibag police) मुद्देमालासह गजाआड केले. हा गैरप्रकार सीसी टीव्ही कॅमेरामुळे (cctv camera) उघडकीस आला. या गुन्ह्यातील आरोपीमध्ये पेण तालुक्यातील काश्मीरवाडी व शिहू येथील दुकानदारांचा समावेश आहे. त्यांना मंगळवारी अलिबाग येथील न्यायालयात (Alibag court) हजर करण्यात आले होते. तर उर्वरित चार जणांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

वेश्वी या ठिकाणी पोषण आहाराचा साठा करून ठेवला होता. त्या ठिकाणी काम करणाऱ्या संतोष नाईक या कामगाराने माल गाडीत भरताना चोरल्याचे सीसी टीव्हीत दिसून आले. तेल व साखर मिळून सुमारे एक टनाचा साठा चोरीला गेल्याचे तक्रारीमध्ये सांगण्यात आले. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून अलिबाग पोलिसांनी तपास करून चोरी करणाऱ्याला अटक केली.

या गुन्ह्यात आणखी पाच जणांचा समावेश असल्याचे त्याने कबूल केले. त्यात पेण तालुक्यातील काश्मीरवाडी येथील दुकानदार व शिहू येथील दुकानदाराचा समावेश आहे. पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ओमकार कावळे यांनी दुष्यंत म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, प्रशांत पाटील, हेमंत खाडे या पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४५० किलो साखर जप्त केली. यातील प्रशांत पाटील व हेमंत खाडे हे किराणा दुकानदार आहेत. या दोघांना बुधवारी अलिबाग न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. तसेच अन्य चार जणांना गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती अलिबाग पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT