मुंबई

एम.कॉमचा निकाल लागून दोन महिने झाले; अजूनही गुणपत्रिकेचा पत्ता नाही; विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

तेजस वाघमारे


मुंबई  : मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या एमकॉम अंतिम सत्र परीक्षेचा निकाल 11 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर होऊन दोन महिने होत आले तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण आणि नोकरीसाठी अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांना तातडीने गुणपत्रिका उपलब्ध करून देण्याची मागणी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल आणि गुणपत्रिका देण्यात विलंब लावला आहे. एमए पॉलिटिकल सायन्स अभ्यासक्रमाचा निकाल लावण्यासही विद्यापीठाला नवीन वर्षाची वाट पाहावी लागली. एमकॉमच्या विद्यार्थ्यांचा निकाल नोव्हेंबरमध्ये जाहीर होऊनही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यास अजूनही वेळ मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांच्याकडे अर्ज करून गुणपत्रिका मिळवून देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार तांबोळी यांनी कुलगुरू आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांना तातडीने गुणपत्रिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली. ज्या विद्यार्थ्यांच्या शुल्कावर आपले पगार देण्यात येतात, त्याच विद्यार्थ्यांना आपण आवश्‍यक सेवासुविधा देण्यापासून अंग काढून घेता आहात, असा सवालही त्यांनी पत्रात केला आहे. मुळात गुणपत्रिका छपाई करण्यापूर्वी त्या एकदा पडताळून पाहणे गरजेचे आहे; मात्र विद्यापीठ याची काळजी न घेताच चुकीच्या गुणपत्रिका छापून विद्यार्थ्यांना पाठवतात.

अशा अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. चुकीच्या गुणपत्रिका छापाईमुळे दर वर्षी हजारो कागद खराब होतात. हे प्रकार टाळण्यासाठी विद्यापीठांत योग्य गुणपत्रिका छापून विद्यार्थ्यांना पाठवावी; जेणेकरून विद्यार्थ्यांचाही त्रास कमी होईल, अशी मागणीही तांबोळी यांनी केली आहे.

Although it has been two months since the results were announced the students have not received their marks in mumbai university 

-------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT